(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंजिनिअरची नोकरी सोडून फुलशेतीचा प्रयोग, 6 महिन्यात लाखोंचा नफा
एका तरुणाने इंजिनिअरची (engineer) नोकरी सोडून फुलशेती सुरू केली आहे. आज या फुलशेतीतून (flower farming) तो तरुण लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे.
Success Story: अलिकडच्या काळात अनेक तरुण प्रयोगशील शेती करत आहेत. तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करत आहेत. एका अशाच तरुणाने इंजिनिअरची (engineer) नोकरी सोडून फुलशेती सुरू केली आहे. आज या फुलशेतीतून (flower farming) तो तरुण लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. सुशांत दत्ता असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे.
जमशेदपूर येथील पाटमाडा येथील रहिवासी असलेल्या सुशांत दत्ता यांनी अभियंता झाल्यानंतर अनेक कंपन्यांच्या नोकरीच्या ऑफर नाकारल्या आणि नवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सुशांतने आजोबांची पारंपरिक शेती नव्या पद्धतीने सुरू केली. आज तो जरबेरा फुलांची लागवड करून लाखोंची कमाई करत आहे. ते सुमारे पाच रंगांच्या जरबेरा फुलांची लागवड करत आहेत. बाजारात विकल्या जाणार्या फुलांमध्ये हे फूल सर्वात महाग आहे. एक काळ होता जेव्हा लोक हे फूल कोलकाता आणि बंगळुरु येथून आणायचे. आज ही फुले तयार करून बाजारात पाठवली जात आहेत. सर्वप्रथम या लोकांनी आपल्या गावातील मातीची चाचणी करुन घेतली आणि नंतर बँकेकडून कर्ज घेऊन पॉली हाऊस बांधले. मग गुगलच्या मदतीने या लोकांनी जरबेरा फुलांची लागवड सुरू केली आणि आज अवघ्या 6 महिन्यांत लाखो रुपये कमवत आहेत.
इंजिनीअरिंगची नोकरी सोडून शेतीला सुरुवात
इंजिनीअरिंग केल्यानंतर सुशांत दत्ताने अनेक ठिकाणांहून नोकरीच्या ऑफर आल्या होत्या. परंतु त्यांना वाटले की जर आपण पारंपारिक शेती केली आणि आपल्या पूर्वजांची जुनी परंपरा स्वीकारली तर आपल्याला खूप फायदा होईल. त्यांनी जरबेराची लागवड सुरू केली आहे. सध्या 2700 बियांची लागवड करण्यात आली असून या रोपांना आठवड्यातून दोनदा फुले येतात. ही फुले बाजारात विकत आहेत. यातून चांगला नफा मिळत आहे.
आम्ही पहिल्यांदा जरबेरा फुलाची लागवड केली आहे. या फुलशेतीतून लाखो रुपयांचा नफा मिळत आहे.
आगामी काळात चार लाखांचा नफा
फुल उत्पादक शेतकरी राजेश रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार आमची सगळी मुलं शिकलेली आहेत. काही इंजिनिअर आहेत तर काही इंजिनिअर होणार आहेत. मात्र, या मुलांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात ही मुलं तीन ते चार लाख रुपयांचा नफा कमावतील. जरबेराची फुले पूर्वी बंगाल आणि बंगळुरुमधून येत होती. आज पाटमाडा या छोट्या गावात जरबेराची लागवड केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
गांडूळ खताद्वारे शोधला प्रगतीचा मार्ग, 43 वर्षीय महिलेचा नाविण्यपूर्ण प्रयोग