एक्स्प्लोर

गांडूळ खताद्वारे शोधला प्रगतीचा मार्ग, 43 वर्षीय महिलेचा नाविण्यपूर्ण प्रयोग

आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. गांडूळ खताच्या निर्मितीद्वारे त्यांनी प्रगतीचा मार्ग शोधण्‍याचा प्रयत्न केला आहे. 

Success Story : अलिकडच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहे. शेतीबरोबरच जोडव्यवसाय देखील करत आहे. यामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील काम करताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली गावात राहणाऱ्या  सुवर्णा भगवान पाटील (Suvarna Bhagwan Patil) यांची यशोगाथा आहे. गांडूळ खताच्या निर्मितीद्वारे त्यांनी प्रगतीचा मार्ग शोधण्‍याचा प्रयत्न केला आहे. 

शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि कालांतराने एका शेतकऱ्यासोबत विवाह झालेल्‍या सुवर्णा भगवान पाटील या रुढीवादी शेतकरी म्हणून समाधानी नव्हत्या. त्‍यांची नेहमी आणखी काहीतरी करण्याची इच्छा होती. कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली गावात 2.5 एकर जमिनीच्‍या मालक असलेल्‍या सुवर्णा या पारंपारिक कृषी पद्धतींऐवजी नाविन्‍यपूर्ण कृषी पद्धतींचा शोध घेत होत्‍या. तसेच त्‍या आपल्‍या चार सदस्‍यांच्‍या कुटुंबाचे पालनपोषण करण्‍यासाठी उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ करण्‍याचा प्रयत्‍न देखील करत होत्‍या. ऊस हे दीर्घकालीन (12 ते 14 महिने) पीक आहे. 

तज्ञांकडून घेतलं गांडूळखतासह पुनरुत्‍पादक कृषी पद्धतीचं मार्गदर्शन

हवामान बदलामुळं हवामानातील अनियमितता पाहता सुवर्णा यांच्‍यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना एका पिकाच्या उत्पन्नावर कुटुंब चालवणे, तसेच शाश्‍वतपणे शेती करणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. 43 वर्षांच्या सुवर्णा कोका कोला फाऊंडेशनच्‍या पाठिंब्‍यानं सॉलिडरिदाद आणि दालमिया भारत शुगर इंडस्‍ट्रीज लि. (डीबीएसआयएल) यांनी संयुक्‍तपणे राबवलेल्‍या उन्‍नती मीठा सोना अंतर्गत त्‍यांच्‍या गावामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या माती आरोग्‍य सुधारणा प्रशिक्षणामध्‍ये त्या सामील झाल्‍या होत्या. यावेळी त्‍यांना आशेचा किरण दिसला. सुवर्णा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील दालमिया भारत शुगर निनाईदेवीला ऊस पुरवठा करतात. अधिक माहिती जाणून घेण्याच्या उत्सुकतेसह त्‍यांनी गावातील फार्मर फील्ड स्कूलला (शेतकरी क्षेत्र शाळा) भेट दिली, जेथे त्‍यांना तज्ञांकडून भाषणादरम्‍यान गांडूळखतासह पुनरूत्‍पादक कृषी पद्धती आणि जमिनीला, तसेच शेतकऱ्यांना होणारे त्‍यांचे फायदे याबाबत मार्गदर्शन मिळाले.

जमिनीचे आरोग्य हे माणसाच्या आरोग्याइतकेच महत्त्वाचे 

सुवर्णा यांना समजले की, त्‍यांच्‍या ऊसाच्‍या शेतात जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत आहे आणि गांडूळखत हे जैव खत पर्यावरणास अनुकूल आणि किफायतशीर पर्याय आहे. त्‍यांनी 2022 मध्ये या उपक्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि येथून त्‍यांच्‍या प्रगतीशील शेतकरी-उद्योजक बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. सुवर्णा म्‍हणाल्‍या माझे भूमातेवर प्रेम आहे. आपल्‍याला जमिनीमधून अन्‍न मिळते या एकमेव कारणामुळं मी जमिनीची पूजा करते. जमिनीचे आरोग्य हे माणसाच्या आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण उपक्रमामध्‍ये मला कळले की, गांडूळखत वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि मी गांडूळ व कंपोस्ट विकून पैसेही कमवू शकते. तेव्हा मी माझे स्वतःचे गांडूळखत युनिट उभारायचे ठरवले.

 गांडूळ खताचा नियमित वापर केल्यास जमिनीतील सुपीकता वाढते

गांडूळखत हा कचरा म्हणजेच अन्नाचे तुकडे, वनस्पती साहित्य आणि पशुधनाचा कचरा (गुरांचे शेण) - मातीसाठी आवश्‍यक पोषक घटकांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रसिद्ध मार्ग आहे. गांडूळे जमिनीत राहून आणि गांडूळखताद्वारे सेंद्रिय पदार्थांचे कृमीत रूपांतर करून या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. या गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते, तसेच जमिनीचे आरोग्य सुधारते. त्यात उपलब्ध नायट्रोजनच्या पाचपट जास्त, पोटॅशच्या सात पट जास्त आणि नियमित वरच्या मातीत आढळणाऱ्या प्रमाणाच्‍या दीडपट जास्त कॅल्शियम असते. ठराविक कालावधीत गांडूळ खताचा नियमित वापर केल्यास जमिनीतील सुपीकता वाढू शकते आणि रासायनिक खतांची गरजही कमी होते, ज्यामुळे सुवर्णासारख्या अल्पभूधारकांची अधिक बचत होऊ शकते. 

एका बेडच्‍या माध्‍यमातून त्‍या 450 किलो गांडूळखत 

या उपक्रमांतर्गत सुवर्णा यांना वर्मीकंपोस्‍ट बेड (किंवा वर्मी-बेड) मिळाले, तसेच तज्ञ प्रशिक्षक आणि फील्ड कर्मचाऱ्यांकडून त्‍यांच्‍या शेताच्या जवळ ते स्थापित करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. फील्ड टीमने नियमितपणे त्‍यांच्‍या शेताला भेट देत कंपोस्टचे निरीक्षण केले आणि त्‍यांना बेडच्या देखरेखीबाबत सल्‍ला देखील दिला. पाच महिन्यात सुवर्णा यांना बदल दिसून आला. एका बेडच्‍या माध्‍यमातून त्‍या 450 किलो गांडूळखत बनवू शकल्‍या. त्‍यांनी ऊस पिकासाठी या गांडूळखताचा वापर केला. तसेच फिल्‍ड टीमच्‍या सहकार्यासह त्‍यांनी त्‍यांच्‍या घराच्‍या मागच्‍या बाजूस असलेल्‍या अंगणामध्‍ये परसबाग विकसित केली. त्‍या बागेमध्‍ये भाजीपाला, वांगी व भेंडीचे उत्‍पादन करतात आणि आपल्‍या चार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

आत्तापर्यंत 3200 किलोपेक्षा जास्‍त गांडूळखत तयार

सुवर्णा पाटील यांनी या उपक्रमाची अंमलबजावणी करून अजून एक वर्ष देखील झालेले नाही. त्या दोन वर्मी-बेड्सच्‍या माध्‍यमातून 3200 किलोपेक्षा जास्‍त गांडूळखत तयार करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरल्‍या आहेत. त्‍यांनी अतिरिक्‍त गांडूळखत त्‍यांच्‍या गावातील इतर शेतकऱ्यांना विकून  रुपये कमावले. हे उत्‍पन्‍न त्‍यांच्‍या ऊस पिकातून आणि स्‍थानिक दूध संकलन केंद्रावर विकणाऱ्या म्‍हशीच्‍या दूधातून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त आहे. 5000 किलो गुरांचे शेण गांडूळखत तयार करण्‍यासाठी वापरले गेले. गांडूळ खताचा नियमित वापर केल्यानं त्‍यांनी रासायनिक खतांचा वापर कमी केला आहे. या हंगामात त्यांची 8500 रुपयांची बचत झाली आहे. गांडूळ खतामुळं मला पैसे वाचवायला मदत होते, असेही त्‍या यावेळी म्‍हणाल्‍या. मी आता पिकांसाठी गांडूळखतासह फक्त शिफारस केलेल्या रासायनिक खतांचा योग्‍य प्रमाणात वापर करते असे पाटील म्हणाल्या.  

गांडूळ खताचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न

सुवर्णा यांचा गांडूळ खताचा व्यवसाय वाढवण्याचा मनसुबा आहे. मी माझ्या अतिरिक्‍त उत्‍पन्‍नामधून काही उत्‍पन्‍न त्‍या सिव्हिल सर्विसेस परीक्षांसाठी तयारी करत असलेल्‍या त्‍यांच्‍या मुलाला देण्‍यासाठी देखील बचत केलेल्‍या उत्‍पन्‍नाचा वापर करत आहे. प्रत्‍यक्ष परिवर्तन पाहिले तरच विश्‍वास बसतो. सुवर्णा आता त्‍यांच्‍या समुदायामधील प्रमुख आदर्श व्‍यक्‍ती आहेत. इतरांना गांडूळ खत वापराबाबतचा स्‍वत:चा अनुभव सांगत आहेत. 

 प्रशिक्षण देणाऱ्यांचे आभार 

'मी वर्मी-बेडसह मला साह्य करणाऱ्यांचे तसेच गांडूळखत कसे तयार करावे याबाबत प्रशिक्षण देणाऱ्यांचे आभार मानत असल्याचे पाटील म्हणाल्या. मी आता माझ्या गावातील इतर महिला शेतकऱ्यांना त्‍यांच्‍या शेतामध्‍ये वर्मी-बेड स्‍थापित करण्‍यास प्रेरित करत आहे. ज्‍यामुळं त्‍या देखील अतिरिक्‍त उत्‍पन्‍न कमावू शकतील आणि भूमातेचे संरक्षण करू शकतील. अशीच एक महिला शेतकरी आहे. त्यांचे नाव वनिता आहे. त्या  36 वर्षीय आहेत. तिने आपल्या 1.5 एकर ऊसाच्या शेतात वर्मी-बेड स्‍थापित केले आहे. नियमितपणे पुनरुत्‍पादक कृषी पद्धतींवरील प्रशिक्षण सत्रांमध्‍ये उपस्थित राहते. 'मला या सत्रांमधून मिळालेल्‍या माहितीमधून गांडूळखत पिकांचे, तसेच मातीचे आरोग्‍य सुधारण्‍यास कशाप्रकारे मदत करू शकते हे समजले. 

उन्‍नती मीठा सोना उपक्रम शेतकऱ्यांची कृषी उत्‍पादकता व उत्‍पन्‍न मोठ्या प्रमाणात वाढवण्‍याचा, सानुकूल सिंचनाच्‍या माध्‍यमातून पाण्‍याचे जतन करण्‍याचा, संसाधनांच्‍या कार्यक्षम वापराला चालना देण्‍याचा, पुनरूत्‍पादक पद्धतींच्‍या माध्‍यमातून जमिनीचे आरोग्‍य सुधारण्‍याचा प्रयत्न करते. तसेच शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी पोषण आणि संतुलित आहार उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न करतो.

महत्त्वाच्या बातम्या:

5 लाखांचं कर्ज घेऊन तरुण शेतकऱ्यानं उभी केली स्वत:ची कंपनी, आज करतोय 3 कोटींची उलाढाल

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Embed widget