Explainer : रशियानं युक्रेनमधील प्रांताबाबत घेतलेल्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
Russia Ukraine Tension : डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) हे पूर्व युक्रेनमधील रशियन फुटिरतावाद्यांच्या ताब्यात असलेले दोन देश. जे 2014 मध्ये युक्रेनियन सरकारच्या नियंत्रणापासून वेगळे झाले होते.
Russia Ukraine Tension : अमेरिका आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाचा परिणाम (Russia Ukraine Crisis) संपूर्ण युरोपमध्ये दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये जेव्हा वॉशिंग्टननं युक्रेनच्या सीमेजवळ रशियन सैन्याच्या असामान्य हालचालींचा अहवाल दिला होता, तेव्हापासून या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली होती.
रशिया फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं मत अमेरिकेकडून व्यक्त केलं जात होतं. त्यांचा दावा आहे की, सुमारे 1 लाख रशियन सैन्य गेल्या आठवड्यापासून युक्रेनच्या सीमेजवळ तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया थंड वातावरण पाहता युक्रेनभोवतीचा बर्फ वितळण्याची वाट पाहत आहे.
दरम्यान, सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधित करताना पूर्व युक्रेनपासून विभक्त झालेल्या डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या दोन शहरांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाला संबोधित करताना युक्रेनला अमेरिकेची वसाहत असल्याचं सांगितलं आणि युक्रेनचा कारभार हा अमेरिकेवर अवलंबून असल्याचं म्हटलं.
पूर्व युक्रेनमधील दोन फुटीरतावादी प्रदेश
डोनेस्तक आणि लुहान्स्क हे पूर्व युक्रेनमधील रशियन बंडखोरांच्या ताब्यात असलेले दोन प्रदेश आहेत. जे 2014 मध्ये युक्रेनियन सरकारच्या नियंत्रणापासून दूर गेले आणि त्यांनी स्वतःला स्वतंत्र "पीपल्स रिपब्लिक" घोषित केलं. रशियन-समर्थित फुटीरतावादी 2014 पासून या प्रदेशात युक्रेनियन सरकारी सैन्यांशी लढत आहेत, कीवच्या म्हणण्यानुसार, या संघर्षात सुमारे 15 हजार लोक मारले गेले आहेत. त्याचवेळी युक्रेन दावा करत आहे की, त्यावेळीही रशिया या दोन फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या शहरांना पाठिंबा देत होता. या लढतीत रशियानं स्वतःहून कोणतीही बाजू घेण्यास नकार दिला होता.
दरम्यान, रशियन बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या या दोन फुटीरतावादी शहरांना गुप्त पद्धतीनं लष्करी मदत, आर्थिक मदत, COVID-19 लसींचा पुरवठा आणि रहिवाशांना किमान 800,000 रशियन पासपोर्ट जारी करण्यासह विविध मार्गांनी मदत करत आहे.
रशियानं उचललेल्या पावलाचा नेमका अर्थ काय?
2014 नंतर प्रथमच, सोमवारी रशियानं उघडपणे सांगितलं की, ते डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) ला युक्रेनचा भाग मानत नाही. आता मॉस्को उघडपणं फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या या भागात लष्करी सैन्य पाठवू शकतो, तसेच, युक्रेनचा बचाव करण्यासाठी मित्र म्हणून ते हस्तक्षेप करत असल्याचा मॉस्को आता युक्तिवाद करू शकतो.
अलेक्झांडर बोरोदाई, एक रशियन संसद सदस्य आणि माजी डोनेस्तक राजकीय नेते आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात रॉयटर्सला सांगितलं होतं की, फुटीरतावादी त्यानंतर युक्रेनियन सैन्याच्या ताब्यात असलेल्या डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) प्रदेशांचा काही भाग ताब्यात घेण्यास रशियाला मदत करण्याचा प्रयत्न करतील. असं झाल्यास रशिया आणि युक्रेन यांच्यात उघड लष्करी संघर्ष होऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia-Ukraine conflict : युद्ध पेटणार? पुतिन यांच्याकडून युक्रेनवर 'सर्जिकल स्ट्राइक'; दोन प्रांतांना देश म्हणून मान्यता
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
- Russia Ukraine Conflict : पुतीन यांचं मोठं वक्तव्य, युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी शांतता योजना नाहीच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha