Stock Market : शेअर बाजाराला घसरणीने सुरूवात, सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण
Stock Market : शेअर बाजारात आज सुरूवातीलाच घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण झाली तर निफ्टी 100 अंकांनी कोसळला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर आज आयटी, वित्त क्षेत्रातील शेअर्ससह एचडीएफसी आणि एनटीपीसीचे शेअर्स पडले आहेत.

Stock Market : शेअर बाजारात आज सुरूवातीला घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज सकाळीच 300 अंकांची घसरण झाली तर निफ्टी 100 अंकांनी कोसळला. जागतिक बाजारपेठांमधील संकेतांचा आज शेअर बाजारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
शेअर बाजार सुरू झाल्यानंतर आज आयटी, वित्त क्षेत्रातील शेअर्ससह एचडीएफसी आणि एनटीपीसीचे शेअर्स पडले आहेत. तरआयटीसी आणि टायटनचे तिमाहीचे निकाल जाहीर होणार असल्याने दोन्ही कंपन्यांचे शेअर्स वाढले आहेत. अमेरिकेतील टेक कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे भारतीय बाजारातील आयटी कंपन्यांचे शेअर्सही घसरले आहेत.
बाजार सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन मिनिटांनंतर सेन्सेक्स 59 हाजर 400 च्या खाली घसरला. तर निफ्टी 17 हजार 767 पासून सुरू झाला. आज निफ्टीच्या 50 पैकी फक्त 30 शेअर्स वाढले आहेत तर 18 शेअर्स घसरले असून दोन शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत आहेत. बँक निफ्टीमध्येही घसरण झाली असून तो सुमारे 100 अंकांनी घसरला आहे. 100 अंकांनी घसरून बँक निफ्टी 39 हजार 233 वर व्यवहार करत आहे.
आज HDFC 1.68 टक्के, बजाज फायनान्स 1.34 टक्के, इंडसइंड बँक 1.28 टक्क्यांनी आणि एसबीआय लाइफ 1.06 टक्क्यांनी खाली आले आहेत. तर आयशर मोटर्स 0.9 टक्क्यांनी घसरला आहे. याबरोबरच टाटा कॉन्सो 3.25 टक्क्यांनी वाढला आहे. एशियन पेंट्स 1.12 टक्क्यांनी वाढला. टाटा मोटर्स 1.02 टक्के आणि JSW स्टील 0.93 टक्क्यांनी वाढला. तर ब्रिटानिया 0.81 टक्क्यांनी वाढला आहे.
प्री-ओपन मार्केटमध्ये आज 30 अंकांची घसरण झाल्यानंतर सेन्सेक्स 59 हजार 528 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय निफ्टी 12 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
दरम्यान, युक्रेन-रशियामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या निक्केई निर्देशांकातही घसरण झाली आहे.
संबंधीत बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
