Share market : शेअर बाजारात जोरदार नफा वसुलीने घसरण; सेन्सेक्स 60 हजाराखाली
stock market updates: शेअर बाजारातील तज्ज्ञ, अभ्यासकांनुसार, शेअर बाजारातील घसरण ही गुंतवणुकदारांसाठी संधी आहे.
Stock Market Closing: मुंबई शेअर बाजारात आज घसरण झाल्याचे दिसून आले. गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याने ही घसरण झाल्याचे म्हणतात. घसरणीमुळे सेन्सेक्स पुन्हा एकदा 60 हजार अंकाखाली बंद झाला. निफ्टीदेखील 18 हजार अंकाखाली बंद झाला. सेन्सेक्स 433 अंकांच्या घसरणीनंतर 59919 अंकावर तर निफ्टी 143 अंकाच्या घसरणीसह 17,873 अंकावर बंद झाला.
आज शेअर बाजारात सर्वच क्षेत्रात घसरण दिसून आली. बँकिंग क्षेत्रातील शेअरच्या घसरणीमुळे बँक निफ्टी, निफ्टी एफएमसीजी क्षेत्रांमध्ये घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रांमध्ये नफा वसुलीमुळे घसरण झाल्याचे दिसून आले.
आज, घसरण झालेल्या शेअरमध्ये आयओसी, टेक महिंद्रा, एसबीआय आणि ओएनजीसी या क्षेत्रांचा समावेश आहे. मारुती सुझुकी, श्री सिमेंट्समध्येही घसरण झाल्याचे दिसून आले. तर, टायटनचा शेअरचा दर 43 रुपयांनी वधारला. टायटनच्या शेअरचा दर 2528 रुपये इतका झाला. हिंदाल्कोच्या शेअरमध्ये 4.20 रुपयांची घट झाली. टीसीएस, टाटा स्टील या शेअरचा दरही आज वधारला होता.
शेअर बाजारातील तज्ज्ञ, अभ्यासकांनुसार, शेअर बाजारातील घसरण ही गुंतवणुकदारांसाठी संधी आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी नफा वसुली होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. त्यामुळे काही शेअर चांगल्या दरात खरेदी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित वृत्त:
Nykaa: Nykaa: नायकाच्या फाल्गुनी नायर यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश
ITR Filing: आयकर पात्र उत्पन्न नसतानाही भरा ITR;'असे' आहेत फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha