Nykaa: Nykaa: नायकाच्या फाल्गुनी नायर यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश
फाल्गुनी नायर यांनी 1983-84 मध्ये आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केलंय. त्यांनी सुमारे 8 वर्ष एफ. फर्ग्युसन अॅंड कंपनीत काम केलंय. त्यानंतर त्यांनी जवळपास 20 वर्षे कोटक महिंद्रा बॅंकमध्ये कार्यरत होत्या.
Falguni Nayar Story: ब्यूटी और पर्सनल केयरची मोठी कंपनी नायका (Nykaa) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नायका कंपनीचा बुधवारी आयपीओ (IPO) लॉन्च झाला. नायकानं शेअर बाजारात प्रवेश करतात कंपनीचं भांडवल 1 लाख कोटींच्या पुढे गेलंय. तर, कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांनी जगभरातील श्रीमंताच्या यादीत समावेश केलाय.
नायका कंपनीत सुमारे अर्ध भांडवल असलेल्या फाल्गुनी नायरची भागेदारी 6 बिलियनच्या जवळपास पोहोचलीय. जे भारतीय चलनात सुमारे 3 हजार 300 कोटी रुपये आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, फाल्गुनीचे नाव सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला अब्जाधीश म्हणून नोंदवण्यात आलंय.
फाल्गुनी नायर यांनी इन्वेस्टमेंट बँकर म्हणून नोकरी केलीय. त्यांनी 2012 मध्ये नायकाची सरुवात केलीय. महिलांना सौंदर्य खरेदी आणि वैयक्तिक काळजी घेण्याचा पर्याय देण्यासाठी हे देशातील पहिले व्यासपीठ ठरले. ऑनलाईन मार्केटप्लेस म्हणून उघडलेल्या नायकाची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली. नायकानं 2014 मध्ये त्यांचं पहिलं स्टोर उघडलं होतं. मात्र, ऑगस्ट 2021 पर्यंत त्यांची चांगली प्रगती झाली. त्यांचं ऑगस्टपर्यंत देशभरात 40 शहरांमध्ये 80 स्टोर झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फाल्गुनी नायर अनेक वर्षे अमेरिका आणि युरोपमध्ये रोड शो आयोजित करण्यासाठी भारतीय कंपन्यांच्या संस्थापकांसाठी पैसे गोळा करण्यासाठी मदत करत होत्या. जिथे आयपीओमधील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अगोदरपासून रोड शो केले जातात.
फाल्गुनी नायर यांनी 1983-84 मध्ये आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केलंय. त्यांनी सुमारे 8 वर्ष एफ. फर्ग्युसन अॅंड कंपनीत काम केलंय. त्यानंतर त्यांनी जवळपास 20 वर्षे कोटक महिंद्रा बॅंकमध्ये कार्यरत होत्या. फाल्गुनी या 50 वर्षाच्या असून त्यांचे पती संजय नायर अमेरिकेच्या प्रायव्हेट इक्विटी फर्म केकेआरचे सीईओ आहेत.
हे देखील वाचा-
- PF Withdrawal : अत्यंत महत्त्वाचं! पीएफ अकाउंटचा 'हा' नंबर शेअर कराल, तर पश्चाताप करण्याची वेळ येईल
- stock market : गुंतवणुकदारांची नफा वसुली जोरात; निफ्टी-सेन्सेक्समध्ये घसरण, 'या' क्षेत्राला फटका
- T Plus 1 Settlement Cycle : शेअर्स विकल्यानंतर एकाच दिवसात अकाउंटमध्ये पैसे येणार, 25 फेब्रुवारीपासून नवा नियम लागू