Stock Market : शेअर बाजारात गुरूवारी घसरण कायम
Stock Market Update: आज शेअर बाजार सुरू होताच अस्थिरतेचे संकेत मिळाले आणि बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टीत दोन्हीतही घसरण झाली
Stock Market Update : आज मुंबई शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आणि बाजार नकारात्मक निर्देशांकासह बंद झाला. खरतंर आज शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली होती. बाजारातील व्यवहार सुरू होताच सुरुवातीचा कल तेजीचा दिसून आला. मात्र, काही वेळेतच बाजारात सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्सने 221 अंकाची उसळी घेतली होती तर निफ्टी 74 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. परंतु काही वेळात बाजार सुरू होताच अस्थिरतेचे संकेत मिळाले आणि बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टीत दोन्हीतही घसरण झाली. सेन्सेक्स 104 अंकांनी घसरुन 57 हजार 892 वर तर निफ्टी 18 अंकानी घसरून 17 हजार305 वर बंद झाला..
आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर तणाव सुरू आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कुठे पडझड तर कुठे बाजार स्थिर पाहायला मिळाला आहे. अमेरिकी बाजार लालफितीत तर आशियाई बाजारात यूक्रेनच्या पार्श्वभूमीमुळे कुठे स्थिर वातावरण तर कुठे पडझड पाहायला मिळाली आहे. जपानच्या निक्केईच्या निर्देशांकातही घसरण झाली आहे.
जागतिक बाजारातल्या अस्थिर वातावरणाचा भारतीय बाजारपेठेला देखील फटका बसला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत काहीशी सुधारणा झाली असून तेलाचे भाव 93 डॉलर प्रति बॅरेल इतके झाले आहे. भारताला देखील याचा किंचितसा दिलासा मात्र डॉलरच्या तुलनेत रुपया अजूनही 75 पारच आहे. निफ्टी बॅंक 1.11 टक्क्यांनी खाली असून 422 अंकांची घसरण झाली आहे. तर ऊर्जा क्षेत्र दोन टक्क्यांनी वधारले आहे.
आजचे टॉप गेनर्स
- एचडीएफसी
- रिलाईन्स
- पॉवर ग्रिड
- एचयूएल
- एलटी
- आयटीसी
- टेक महिंद्रा
- टायटन
आजचे टॉप लूजर्स
- ICICI Bank
- अॅक्सिस बँक
- अल्ट्रा केमिकल
- इंडसइंड बँक
- नेस्ले इंडिया
- टीसीएस
- कोटक बँक
- सन फार्मा
- एसबीआय
- HDFC Bank
- Maruti
- NTPC
बॅंकांचे आणि आयटीचे समभाग गडगडले आहे. आयसीआयसीआय बॅंक, ॲक्सिस बॅंक, अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात घसरण झाली असून तर एचडीएफसी बॅंक, ओएनजीसी, रिलायन्सचे समभाग वधारले आहेत. अमेरीकेच्या फेड रिझर्व्हकडून मार्च महिन्यात व्याजदरात वाढ करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकी डॉलर मजबूत करण्याचा इशारा दिला असून भारतीय रुपयावर परिणाम होणार आहे.