एक्स्प्लोर

SBI Share Price : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 25000 कोटींचा मेगा QIP लाँच, शेअरमध्ये तुफान तेजी, स्टॉक किती रुपयांवर?

SBI QIP : स्टेट बँक ऑफ इंडियानं देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 25000 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : भारतीय स्टेट बँकेनं 16 जुलै रोजी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 25 हजार कोटी रुपयांच्या उभारणीचं नियोजनं केलं आहे. स्टेट बँकेनं QIP लाँच करुन स्टॉकची फ्लोअर प्राईस 811.05 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ही रक्कम आजच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरच्या किंमतीपेक्षा 2.46 टक्क्यांनी कमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं आणलेला QIP पूर्णपणे सबस्क्राईब झाला तर हा भारतातील सर्वात मोठा QIP ठरणार आहे. यापूर्वी कोल इंडियानं 22560 कोटी रुपयांचा QIP आणला होता. स्टेट बँक ऑफ इंडियानं मे महिन्यात QIP ला मंजुरी दिली होती. यापूर्वी जून 2017 मध्ये स्टेट बँकेनं QIP द्वारे 15000 कोटी रुपयांची उभारणी केली होती.  

याशिवाय स्टेट बँकेच्या बोर्डानं 2025-26 मध्ये बाँडसच्या मदतीनं 20000 कोटी रुपयांच्या उभारणीला देखील मंजुरी दिली आहे. फंड जमा करण्यासाठी बँक, डोमेस्टिक इनवेस्टर्सला Basel III कम्प्लायंट अतिरिक्त टीयर  1 आणि टीयर 2 बाँड जारी करेल. बँकेनं शेअर धारकांना सांगितलं की जिथं आवश्यकता असेल तिथं सरकारकडून मंजुरी घेतली जाईल. 

स्टेट बँकेच्या शेअरमध्ये 2 टक्के वाढ  

स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्टॉक बीएसईवर 2 टक्क्यांनी वाढून 834 पर्यंत पोहोचला होता. बाजार बंद होईपर्यंत एसबीआयचा स्टॉक 831.55 रुपयावंर बंद झाला. बँकेचं बाजारमूल्य 7.42 लाख कोटी इतकं आहे. शेअरची दर्शनी किंमत 1 रुपया असून 2 महिन्यात 42 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या 3 महिन्यात स्टॉक 8 टक्क्यांनी वाढला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात मार्च 2025 पर्यंत सरकारकडे 57.43 टक्के भागीदारी आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरबाबत कव्हरेज करणाऱ्या 50 विश्लेषकांपैकी 40 जणांनी बाय रेटिंग दिलं आहे. 9 विश्लेषकांनी होल्ड रेटिंग दिलं आहे. तर, एका विश्लेषकानं विक्री करण्याचं रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकला बाय रेटिंग सह टारगेट प्राईस 960 रुपये दिलं आहे. 

दरम्यान मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 10 टक्क्यांनी घटला आहे. स्टँडअलोन बेसिसवर निव्वळ नफा 10 टक्क्यांनी घटून 18642.59 कोटी रुपये झाला होता. स्टेट बँकेच्या स्टॉकमध्ये आज वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget