Share Market : शेअर बाजाराची सावध सुरुवात; सेन्सेक्स, निफ्टी किंचीत वाढ
Share Market : शेअर बाजारात आज व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीत किंचींत वाढ झाल्याची दिसून आली.
Share Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सावधपणे झाली. जागतिक बाजारातून फार चांगले संकेत मिळत नसून आशियाई शेअर बाजार घसरले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे.
आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 64 अंकांची तेजी दिसून आली. तर निफ्टी फक्त 3 अंकांनी वधारला होता. निफ्टी 16663 अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स 55614 अंकावर सुरू झाला.
सेन्सेक्स आज सुरू होताच 55,800 अंकांचा टप्पा ओलांडला. बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स वधारला होता. सेन्सेक्स 261.44 अंकांनी वधारत 55,811 चा स्तर गाठला होता.
निफ्टीचे काय ?
निफ्टीमध्ये 50 पैकी 28 शेअरमध्ये तेजी असल्याचे दिसून आले होते. तर, 22 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीदेखील 34546 अंकांवर व्यवहार करत आहेत.
PayTm मध्ये घसरण
पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे. पेटीएमच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. पेटीएमच्या शेअरने 700 रुपयांचा स्तर गाठला आहे. आरबीआयने पेटीएमच्या पेमेंट बँकेवर मागील आठवड्यात निर्बंध लागू केले होते.
शुक्रवारी बाजार वधारला
शुक्रवारी, बाजार बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 85.91 अंकांनी वधारला तर निफ्टीही (Nifty) 35.60 अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 0.15 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,550.30 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.21 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,630.50 वर पोहोचला होता.
शुक्रवारी 2004 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1257 शेअर्समध्ये घसरण झाली. 112 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- IPO : फ्लिपकार्टचे सचिन बन्सल नवी टेक्नॉलॉजीचा 3,350 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार
- Share Market : या आठवड्यात शेअर बाजारासाठी 'हे' महत्त्वाचे निर्णय दिशा ठरवणार; तज्ज्ञ काय म्हणतात वाचा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha