(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला
Share Market Updates : शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला.
Share Market Updates : शेअर बाजार आज तेजीसह सुरू झाला. प्री-ओपनिंगमध्ये आणि सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. सोमवारी अमेरिकन शेअर बाजार वधारला होता. त्याच्या परिणाम जागतिक शेअर बाजारावरही दिसून आला. आशियाई शेअर बाजारात संमिश्र ट्रेंड दिसून आला.
आज सकाळी बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 221.27 अंकांनी वधारत 57,814 अंकांवर सुरू झाला. निफ्टी 75.20 अंकांनी वधारला. निफ्टी 17,297 वर सुरू झाला. सेन्सेक्सचा 57900 अंकाचा टप्पा ओलांडला. त्यानंतर काही वेळ नफा वसुली दिसून आली. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 236 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्स 57,825.90 अंकांवर ट्रेंड करत होता. तर, निफ्टी 65 अंकांनी वधारत 17,288.20 अंकांवर ट्रेंड करत होता.
आज मेटल, मीडिया, ऑइल अॅण्ड गॅस या क्षेत्रांना वगळता इतर क्षेत्रात तेजी दिसत आहे. ऑटोमध्ये 0.70 टक्के, रिअल इस्टेटमद्ये 0.88 टक्के आणि कन्झ्युमर ड्यूरेबल्सचे शेअर 1 टक्क्याने वधारले आहेत. जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले. कच्च्या तेलाच्या मागणीत सतत घट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारा कच्च्या तेलाचे भाव १०८ डाॅलर प्रति बॅरल इतके झाले. चीनमध्ये अनेक ठिकाणी लाॅकडाऊन असल्याने तेलाची मागणी घटली. चीन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. कोरोना परिस्थिती चिघळत चालल्याने शांघाईसारख्या शहरात देखील लाॅकडाऊन लागू करण्यात आला.
आज निफ्टीतील 50 पैकी 37 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, 13 शेअरमध्ये घसरण दिसत आहे. एसबीआयच्या शेअर मध्ये 2.15 टक्क्यांनी वधारला. तर, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरमध्ये 1.71 टक्क्यांची उसळण दिसून आली. एचडीएफसीमध्ये 1.67 टक्के, एशियन पेंट्समध्ये 1.45 टक्के, आणि ग्रासिममध्ये 1.40 टक्क्यांनी वधारला आहे.
दरम्यान, सोमवारी, सेन्सेक्स 231 अंकांनी वधारत सेन्सेक्स 57 हजार 593 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 69 अंकांनी वधारुन निर्देशांक 17, 222 वर बंद झाला. आयटी क्षेत्र, फार्मा क्षेत्र, आरोग्यसेवा आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रामध्ये घसरण झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: