(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोमवार तुमच्यासाठी ठरू शकतो लकी! फक्त 'या' दहा पेनी स्टॉक्सवर नजर ठेवल्यास मालामाल होण्याची संधी
आज शेअर बाजारत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तुम्हाला सोमवारी चांगला परतावा हवा असेल तर खालील पेनी स्टॉक्सवर तुमची नजर असायला हवी.
मुंबई : शुक्रवारी शेअर बाजार (Share Market) चालू असताना अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक सेन्सेक्स (Sensex) 77230 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये 269 अंकांची पिछेहाट पाहायला मिळाली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 66 अंकांच्या पडझडीसह 23500 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी खेरदीदार आणि विक्री करणाऱ्यांत मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. शुक्रवारी दुपारनंतरच्या सत्रात बाजार काही प्रमाणात सावरला. त्यामुळे शुक्रवारी काही गुंतवणूकदारांचे नुकसान झाले तर काही गुंतवणूकदारांना फायदा झाला.
दरम्यान, सोमवारीही तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर खाली दिलेले 10 पेनी स्टॉक्स तुमच्यासाठी लकी ठरू शकतात. या सर्व शेअर्सना शुक्रवारी 10 टक्क्यांपर्यंत अप्पर सर्किट लागले होते.
या दहा पेनी स्टॉक्सवर ठेवा नजर
BGIL Films And Technologies Ltd या कंपनीचे शेअर शुक्रवारी 7.71 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरमध्ये शुक्रवारी 9.99 टक्क्यांची वाढ झाली.
JLA Infraville Shoppers Ltd या कंपनीचा शेअर शुक्रारी 5.63 रुपयांनी वाढला. या शेअरमध्ये 9.96 टक्क्यांची वाढ झाली.
Diksha Greens Ltd हा शेअर शुक्रवारी 9.74 टक्क्यांच्या वाढीसह 3.38 रुपयांवर पोहोचला.
Integra Essentia Ltd हा शेअरही शुक्रवारी 2.05 रुपयांनी वाढला. या शेअरमध्ये शुक्रवारी 9.63 टक्क्यांची वाढ झाली.
Sawaca Business Machines Ltd हा शेअर शुक्रवारी पाच टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपयांवर पोहोचला.
Cranes Software International Ltd हा शेअर शुक्रवारी 6.93 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
Beeyu Overseas Ltd या कंपनीचा शेअऱ 4.99 टक्क्यांच्या वाढीनंतर 5.26 रुपयांवर पोहोचला.
Darjeeling Ropeway Company Ltd हा सेअर शुक्रवारी 5.26 रुपयांवर पोहोचला.
Infomedia Press Ltd कंपनीचा शेअर शुक्रवारी 7.36 रुपयांपर्यंत वाढला. या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
Umiya Tubes Ltd या शेअरचा भाव शुक्रवारी 6.32 रुपयांवर गेला. या शेअरमध्ये 4.98 टक्क्यांनी वाढ झाली.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
भारतातील तरुणांना जर्मनीत नोकरी करण्याची संधी, थेट ड्रायव्हर म्हणून मिळणार जॉब!
बँकेत आरडी करताय? 'या' दोन गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर होऊ शकतो मोठा तोटा!
बड्या सरकारी कंपनीचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता, आपल्याला पुन्हा एकदा HMT चे घड्याळ दिसणार?