Share Market : शेअर बाजारात घसरण, निफ्टी 17800 वर; आयटी सेक्टरमध्ये तणाव
Stock Market Updates: जागतिक बाजारात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. आज सुरुवातीच्या सत्रात अदानी ग्रीन, पीबी फिनटेक (PB Fintech), BHEL, M&M या शेअर्समध्ये जास्त चढउतार दिसत आहे.
Share Market Opening Bell : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजाराची (Share Market) घसरणीसह सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (10 फेब्रुवारी) अमेरिकन बाजारातही अस्थिरता पाहायला मिळाली. परिणामी भारतीय शेअर बाजारातही चढउतार कायम आहे.
आज (13 फेब्रुवारी) शेअर बाजारात सेन्सेक्स 6.48 अंकांनी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी वाढून 60689.18 वर उघडला. तर निफ्टी 1.20 टक्के अंकांनी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी वाढून 17857.70 वर उघडला. जागतिक बाजारात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. आज सुरुवातीच्या सत्रात अदानी ग्रीन, पीबी फिनटेक (PB Fintech), BHEL, M&M या शेअर्समध्ये जास्त चढउतार दिसत आहे. बाजार उघडताच निफ्टी 17,800 च्या खाली घसरला आहे.
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात
भारतीय शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्स पूर्णपणे सपाट व्यवहार करताना दिसत आहेत. देशांतर्गत बाजाराला जागतिक बाजारातून कोणताही पाठिंबा मिळत नाही. आज बीएसईचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 29.88 अंकांच्या घसरणीसह 60,652 च्या पातळीवर तर एनएसईचा (NSE) निर्देशांक निफ्टी (Nifty 50) 2.60 अंकांच्या किंचित वाढीनंतर 17,859 वर उघडला.
सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय?
सेन्सेक्स 18 शेअर्सच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 35 शेअर्समध्ये तेजी तर 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
विविध सेक्टरमधील परिस्थिती
आज शेअर बाजारात मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि हेल्थकेअर शेअर्स तेजी दिसून येत आहे. तर याउलट आयटी, मीडिया, पीएसयू बँक, रिअल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि तेल आणि गॅसचे शेअर्स आज घसरणीसह व्यवहार करत आहेत. बँक शेअर्समध्येही सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.
'या' शेअर्सची घोडदौड
अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises), अदानी पोर्ट्स (Adani Ports), एम अँड एम (M&M), बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि यूपीएल (UPL) यांच्या निफ्टीमध्ये घोडदौड सुरु आहे.
'हे' शेअर्स तोट्यात
कोल इंडिया (Coal India), इन्फोसिस (Infosys), एचडीएफसी (HDFC), डिव्हिस लॅब्स (Divis Labs) आणि विप्रो (Wipro) या निफ्टीचं सर्वाधिक नुकसान झालं आहेत.
शेअर बाजारबाबत तज्ज्ञांचं मत काय?
शेअर इंडियाचे हेड ऑफ रिसर्च डॉ. रवी सिंह यांनी सांगितलं की, आज शेअर बाजारात निफ्टी 17800-17900 स्तरावर उघडण्याची अपेक्षा आहे तर, दिवसभराच्या व्यवहारादरम्यान निफ्टी 17700-17950 च्या श्रेणीत व्यवहार करण्याची शक्यता आहे. तसेच आज बाजारात रियल्टी, पीएसयू बँक, मीडिया शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते आणि धातू, ऊर्जा यासह तेल आणि वायू सेक्टरमध्ये घसरण दिसून येऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :