Share Market Opening Bell : घसरणीला ब्रेक, शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला
Share Market Opening Bell : मुंबई शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात तेजीसह झाली.
![Share Market Opening Bell : घसरणीला ब्रेक, शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला share market opening bell Sensex opens 250 points higher Nifty above 17650 level Share Market Opening Bell : घसरणीला ब्रेक, शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/30/e6b83bb72c1b8af7e1dd698c44eef0c6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Share Market Opening Bell : मागील काही दिवसांपासून विक्रीचा सपाटा सुरू असलेल्या शेअर बाजारात (Share Market Opening Bell) आज खरेदीचा जोर दिसून येत आहे. शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी वधारला. तर, निफ्टी निर्देशांक 17650 अंकांवर व्यवहार करत होता. सलगच्या तीन दिवसाच्या पडझडीनंतर अमेरिकन शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. त्याशिवाय, युरोपियन बाजारातही तेजी दिसून आली. त्याशिवाय आशियाई बाजारपेठातही तेजी कायम आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 250.88 अंकांनी वधारत 59338.31 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 69.90 अंकांनी वधारत 17674.90 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 303 अंकांच्या तेजीसह 59,389.15 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 99 अंकांनी वधारत 17,704.60 अंकावर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्समध्ये तेजी दिसत असून दोन कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली होती. त्याशिवाय निफ्टीतील 50 पैकी 43 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर 7 शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. बँक निफ्टी 276 अंकांच्या तेजीसह 39315 अंकाच्या पातळीवर व्यवहार करत होता.
बुधवारी शेअर बाजारात अस्थिरता
बुधवारी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली होती. दिवसभराच्या व्यवहारात बाजारात चढ-उतार सुरू होता. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 54 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 27 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.09 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,085 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,605 वर स्थिरावला. बँक निफ्टीमध्ये 340 अंकांची वाढ नोंदवण्यात आली.
बुधवारी शेअर बाजारात 2076 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. तर, 1259 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच 131 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Anil Ambani: स्विस बँकेत अनिल अंबानींचा पैसा! 420 कोटींच्या करचोरी प्रकरणी IT ची नोटीस
- BSNL Telecom Tower: खासगीकरण सुस्साट! बीएसएनएलच्या 10 हजार टेलिकॉम टॉवरची विक्री होणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)