(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सेक्स 350 हून अंकांनी घसरला
Share Market Opening : शेअर बाजारात आजही चौफेर विक्री असून बाजारात घसरण असल्याचे दिसत आहे.
Share Market Opening : मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी झालेली घसरण आजही कायम राहिल्याचे दिसत आहे. शेअर बाजारात (Share Market) विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स 350 हून अधिक अंकांनी (Sensex Fall) घसरला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी घसरला होता. त्यानंतर विक्रीचा सपाटा वाढल्याने बाजारात घसरण दिसून आली.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. बीएसईचा 30 स्टॉक्सचा निर्देशांक सेन्सेक्स 285.07 अंकांच्या घसरणीसह 59,361 अंकांवर खुला झाला होता. तर, एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 75.55 अंकांच्या घसरणीसह 17,682 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 516 अंकांची घसरण होऊन 59,126.20 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टीत 155 अंकांची घसरण दिसत असून 17,603.10 अंकांवर व्यवहार सुरू होता.
आज शेअर बाजारात सेन्सेक्समधील 30 पैकी चार शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसत आहे. तर, निफ्टीमधील 50 पैकी सहा शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर, उर्वरीत 44 शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. बँक निफ्टीत मोठी घसरण दिसत असून 518 अंकांनी घसरण नोंदवण्यात आली असून 38467 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज एफएमसीजी सेक्टर वगळता इतर सेक्टरमध्ये घसरण असल्याचे दिसून येत आहे. रियल्टीच्या शेअर दरात दोन टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. त्याशिवाय, सार्वजनिक क्षेत्रातील बँक क्षेत्रात 1.47 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. ऑटो निर्देशांकात 1.37 टक्के, बँकिंग सेक्टरमध्ये 1.33 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात 1.32 आणि मीडिया सेक्टरमध्ये 1.30 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात घसरण
शुक्रवारी शेअर बाजारातील तेजीला लगाम लागला. शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 651 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 198 अंकांची घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये 1.08 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,646 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.10 टक्क्यांची घसरण होऊन 17,758 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 670 अंकांची घसरण होत आणि तो 38,985 अंकांवर स्थिरावला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- IPO Watch : कमाईची संधी, 23 तारखेला ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचा आयपीओचं लॉन्चिंग
- Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्था रूळावर, महागाईपासून दिलासा मिळणार?