Share Market Opening Bell: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली.
Share Market Opening Bell: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने (Fedaral Reserve) व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम शेअर बाजारावर (Share Market) दिसून आला. अमेरिकन शेअर बाजारासह इतर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) 380 अंकांनी खाली आला. तर, निफ्टी (Nifty) निर्देशांकदेखील 100 अंकांनी घसरला.
महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केली होती. त्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारातही घसरण दिसून आली. आज सकाळी घसरणीसह बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 137 अंकांच्या घसरणीसह 59,318.93 अंकांवर व्यवहार करत होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकांच्या घसरणीसह 17,687.95 अंकांवर व्यवहार करत होता.
आज ट्रेडिंग सेशनमध्ये ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया सेक्टर वगळता इतर शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. बाजारात घसरण सुरू असताना स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. तर, बँकिंग, आयटी, ऑईल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरातही घसरण दिसत आहे. निफ्टी 50 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. तर, 31 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.
आज शेअर बाजारात आयटीसी, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, एचडीएफसी, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, इन्फोसिसच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी रात्री व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली. फेडरल रिझर्व्हने 0.75 टक्के वाढ केली आहे. फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याज दरात वाढ केली आहे. आगामी बैठकांमध्येही व्याज दरात वाढ करण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हने दिले आहेत.
अमेरिकेतील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दरात वाढ करण्यात येत आहे. वर्ष 2023 पर्यंत व्याज दर हा 4.6 टक्क्यांपर्यंत होण्याचा अंदाज आहे.