FPI : विदेशी गुंतवणूकदारांकडून ऑक्टोबरमध्ये 2,400 कोटींचा व्यवहार, मार्केट स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
Share Market : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 2400 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच FPI ने सप्टेंबरमध्ये 7,600 कोटींहून अधिक रक्कम काढली होती. पण त्यानंतर आता भारतीय शेअर बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी सुरू केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एफपीआयने देशांतर्गत शेअर बाजारात 2,400 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे.
सप्टेंबरमध्ये शेअर्समधून 7,600 कोटी रुपयांहून अधिक पैसे काढले. डिपॉझिटरी डेटाच्या आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान इक्विटीमध्ये निव्वळ 2,440 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सप्टेंबरमध्ये त्यांनी शेअर्समधून 7,600 कोटी रुपये काढले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सलग 9 महिने विदेशी गुंतवणूकदार निव्वळ विक्री करणारे राहिले यापूर्वी एफपीआयने ऑगस्टमध्ये इक्विटीमध्ये 51,200 कोटी रुपयांची आणि जुलैमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. जुलैपूर्वी परदेशी गुंतवणूकदार गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सलग नऊ महिने निव्वळ विक्री करणारे होते.
अहवाल तयार होण्याच्या कालावधीमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) कर्ज किंवा रोखे बाजारातून 2,950 कोटी रुपये काढले आहेत. भारताव्यतिरिक्त तैवान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्येही एफपीआयचा प्रवाह सकारात्मक आहे.
तज्ज्ञांचे मत
अनेक जागतिक आणि देशांतर्गत घटकांमुळे, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक येत्या काही महिन्यांत अस्थिर राहील. अमेरिकेत कमी होत चाललेल्या रोजगाराच्या संधी आणि ऑस्ट्रेलियन सेंट्रल बँकेने अपेक्षेपेक्षा कमी व्याजदरात वाढ केल्याने गुंतवणूकदारांना जागतिक दर लवकरच उच्च शिखरावर जाण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत एफपीआयचा प्रवाह अस्थिर राहील असं मतं कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी मांडलं
तर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या कार्यात सातत्य नाही. ऑक्टोबरच्या सुरुवातीला एफपीआयने माफक प्रमाणात खरेदी केली आहे, परंतु त्यांच्या क्रियाकलापांमध्ये सातत्य राहिलेले नाही अशी प्रतिक्रिया जिओमध्ये फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही.के.विजयकुमार यांनी दिली आहे.