एक्स्प्लोर

Share Market Crash : भारतीय शेअर मार्केट क्रॅश होण्याची भीती खरी ठरली, बाजार उघडताच सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला, निफ्टीही खाली गडगडला

Share Market Crash : अखेर भारतीय मार्केट क्रॅश होण्याची भीती खरी ठरली आहे. सेन्सेक्समध्ये 800 अंकांची घसरण झाली तर निफ्टीत 286 अंकांपर्यंत घसरण झाली होती.

मुंबई: अमेरिका, जपान आणि कोरियाच्या बाजारानंतर भारतीय शेअर मार्केट देखील क्रॅश झालं आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्स 821 अंकांनी घसरला. तर निफ्टी 50 मध्ये देखील घसरण झाली आहे. सेन्सेक्स  821 अंकांनी घसरुन 73421 अंकांवर आला. निफ्टी 50 मध्ये 286 अंकांची घसरण होऊन तो 23080 पर्यंत पोहोचला. 

इराण आणि इस्त्रायलमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे.  यामुळं वाढलेला तणाव, अमेरिका आणि इराण युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यानं सोमवारी भारतीय शेअर बाजार क्रॅश होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. ती भीती खरी ठरली आहे.

गिफ्ट निफ्टीतून घसरणीचे संकेत 

गिफ्ट निफ्टीमध्ये देखील आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गिफ्ट निफ्टी फ्यूजर्स गिफ्ट निफ्टी 23096 अंकांवर पोहोचला होता. त्यामुळं भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

आशियाई बाजारातही घसरण

दक्षिण कोरियातील कोस्पीमध्ये सुरुवातीला 7 टक्के घसरण झाली आहे. हाँगकाँगचा हेंग सेंग निर्देशांक 1.92 टक्क्यांनी घसरला. चीनच्या CSI 300 निर्देशांकात 1.5 टक्क्यांची घसरण झाली. तर, जपानचा निक्केई 225 निर्देशांक 4.6 टक्क्यांनी घसरला. 

इराण इस्त्रायलमध्ये संघर्ष पुन्हा तीव्र

इराणनं इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानं अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीवर संकट निर्माण झालं आहे. इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यापूर्वी इराणच्या संसदेचे अध्यक्ष एमबी घालीबाफ यांनी अमेरिकन नौदलानं केलेली नाकाबंदी आणि लेबनॉनशी संबंधित करारांचं उल्लंघन केलं जातंय.

कच्चा तेलाच्या दरात वाढ 

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष वाढल्यानं तेलाच्या दरात वाढ झाली. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स 3.18 टक्क्यांनी वाढून 96.05 डॉलरर्सवर पोहोचले. तर, अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट फ्यूचर्स 3.46 टक्क्यांनी वाढून 93.67 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 

डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर

भारतीय शेअर बाजारात घसरणीचं चित्र पाहायला मिळालेलं असताना अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात देखील घसरण झाली आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला  आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 34 पैशांनी कमजोर होत 95.32 रुपयांवर खुला झाला. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गेल्या आठवड्यात रेपो रेट जाहीर करताना त्यात कोणताही बदल केला नव्हता. मात्र, आर्थिक वर्ष 2026-27 साठी महागाईचा अंदाज वाढवून 5.1 टक्के केला आहे. याशिवाय जीडीपी वाढीचा दर 6.6 टक्के केला आहे. यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget