एक्स्प्लोर

Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. काही तासात गुंतवणूकदारांचे 2 लाख ट्रिलियन डॉलर बुडाले. भारतीय बाजारात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : अमेरिकन शेअर बाजारात शुक्रवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. एका तासात गुंतवणूकदारांचे 2 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे 190 लाख कोटी रुपये बुडाले. वॉल स्ट्रीटवरील 2026 मधील सर्वात मोठी घसरण आहे. वॉल स्ट्रीटवरील तीन एक्सचेंज डाओ जोन्स, एस अँड पी 500 आणि नॅस्डॅकवर विक्रीचं जोरदार सत्र पाहायला मिळालं. अमेरिकन जॉब मार्केटची आकडेवारी मजबूत राहिल्यानं फेड रिझर्व्हकडून व्याज दर अधिक ठेवला जाण्याची शक्यता असल्यानं  गुंतवणूकदारांनी धडाधड विक्री सुरु केली.  

अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण

अमेरिकन शेअर बाजारात टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सेमीकंडक्टर म्हणजेच चिप कंपन्यांचे स्टॉक घसरले. ब्रॉडकॉम 8 टक्के, मार्वेल टेक्नोलॉजी 16 टक्के, इंटेल 11 टक्के, AMD 11 टक्के, मायक्रॉन टेक्नोलॉजी 13 टक्क्यांनी घसरले. या घसरणीचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर पाहायला मिळाला. 

भारतात ब्लॅक मंडेची भीती पण आशेचा एक किरण 

अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीमुळं भारतीय शेअर बाजारात देखील आज मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय शेअर बाजारात  आज मोठी घसरण झाल्यास आजचा सोमवार ब्लॅक मंडे ठरणार का अशी भीती व्यक्त केली जातेय.  जिओजित इन्वेस्टमेंटसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ. वी.के. विजयकुमार यांनी अमेरिकेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशी संबंधित तेजी थंडावल्यास भारतीय बाजारातून बाहेर जाणारे गुंतवणूकदार परत येऊ शकतात असं म्हटलं आहे. ते म्हणाले की भारतीय बाजारातून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 32296 कोटी रुपये काढून घेतले. तर, जून महिन्यात 6 जून पर्यंत 42926 कोटी रुपये काढून घेतले. 2026 मध्ये  FPI नं  283662 कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतले आहेत.

डॉ. विजयकुमार यांच्या मते भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढन घेण्याचं कारण अमेरिकेचं AI ट्रेड होता. मात्र 5 जूनला नॅस्डॅकमध्ये झालेली 5 टक्क्यांची घसरण एआयचा फुगा  फुटत असल्याचे प्राथमिक संकेत असू शकतात. हाच ट्रेंड सुरु राहिला तर विदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारताकडे परत येऊ शकतात. म्हणजेच येत्या काळात FPI डेटासह, अमेरिकन टेक शेअरची कामगिरी आणि AI ट्रेडवर देखील लक्ष ठेवावं लागेल, त्यातून भारतीय बाजाराची पुढील दिशा स्पष्ट होईल, असं विजयकुमार यांनी म्हटलं. 

दरम्यान, केंद्र सरकार आणि आरबीआयनं विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना व्याज आणि कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय इतर निर्णय देखील घेण्यात आले आहेत. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर
सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी, सोन्याच्या दरात घसरण होणार? अहवालातून महत्वाची माहिती समोर
सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी, सोन्याच्या दरात घसरण होणार? अहवालातून महत्वाची माहिती समोर
IRCTC च्या नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन लाँच, तिकीट बुकिंग सुपरफास्ट होणार, रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज 
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,IRCTC च्या नव्या वेबसाईटचं बीटा व्हर्जन लाँच, तिकीट बुकिंग सुपरफास्ट होणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Embed widget