एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: शेअर बाजारात ऐतिहासिक उसळण, सेन्सेक्स-निफ्टीने आजही गाठला उच्चांक

Share Market Closing Bell: शेअर बाजारात आजही तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा आज ऐतिहासिक उच्चांक गाठला.

Share Market Closing Bell:  मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी जबरदस्त दिसून आला. सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उच्चांकी पातळी गाठली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 383 अंकांनी वधारत 62,887 अंकांची उच्चांकी पातळी गाठण्यास यश मिळवले. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 18678  अंकांची पातळी गाठत आतापर्यंतचा उच्चांक गाठला.

शेअर बाजारात आज दिवसभर खरेदीचा जोर दिसून आला. मात्र, बाजार बंद होताना नफावसुली झाल्याने तेजीला काहीसा लगाम लागला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 177 अंकांच्या तेजीसह 62,681 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक 55.30 अंकांच्या तेजीसह 18618 अंकांवर स्थिरावला. निफ्टीत आज बाजारात व्यवहार झालेल्या 1653 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1717 कंपन्यांचे शेअर दर घसरले होते. 147 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 15 कंपन्यांचे शेअर दर वधारले तर 15 कंपन्यांचे दर घसरले. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 25 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. 

निफ्टीमध्ये  हिंदुस्थान युनिलिव्हर, जेएसडब्लू स्टील, हिरोमोटो कॉर्प, सिप्ला आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या शेअर दरात मोठी तेजी दिसून आली. तर, इंडसइंड बँक, कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी आणि पॉवरग्रीड आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. शेअर बाजारात आज एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. याशिवाय बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल्स, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू या सेक्टरमधील शेअर दर वधारले. तर, दुसरीकडे इन्फ्रा, रिअल इस्टेट ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्येही नफा-वसुली दिसून आली. 

आज सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा किंचीत घसरण दिसून आली होती. त्यानंतर खरेदीचा जोर दिसून आला. काही वेळेतच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला. निफ्टीने 18,631.65 हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. तर, सेन्सेक्सने 62,724.02 गाठला होता. त्यानंतर बाजारात थोडी घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा खरेदीचा जोर दिसून आला आणि  सेन्सेक्स, निफ्टीने उच्चांक गाठला. 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget