एक्स्प्लोर

क्वांट म्यूच्यूअल फंडावर सेबीची मोठी कारवाई, फ्रन्ट रनिंगचा संशय; तपास होणार!

सेबीने क्वांट म्यूच्यूअल फंडावर छापेमारीची कारवाई केली आहे. या फंडात फ्रन्ट रनिंग होत असल्याचा संशय सेबीला आहे. त्याबाबत तपास केला जात आहे.

मुंबई : भांडवली बाजार नियामक संस्था सिक्योरिटीज अँड एक्सजेंच बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने (SEBI) फ्रन्ट-रनिंग च्या प्रकरणात क्वांट म्यूच्यूअल फंडाच्या (Quant Mutual Fund) वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली केली आहे. आपल्या या कारवाईत सेबीने क्वांट म्यूच्यूअल फंडाच्या अनेक ठिकाणांवर शोधमोहीम राबवत जप्तीचीही कारवाई केली आहे. माध्यमांतील रिपोर्टनुसार मुंबई आणि हैदराबाद या दोन ठिकाणांवर जप्ती आणि शोधमोहीम राबवण्यात आली आहे. 

2017 साली म्यूच्यूअल फंडाला परवानगी

गेल्या आठवड्यात शुक्रारी फ्रन्ट रनिंग प्रकरणात क्वांट डीलर्स आणि या प्रकरणाशी निगडित असलेल्या लोकांची चौकशी करण्यात आली होती. क्वांट म्यूचुअल फंडाचे मालक संदीप टंडन आहेत. इस 2017 साली सेबीने या फंडाला परवानगी दिली होती. गेल्या काही महिन्यापासून या फंडाने चांगली प्रगती केलेली आहे. सध्या या फंडाची संपत्ती 90 हजार कोटी रुपये आहे. हीच संपत्ती 2019 मध्ये फक्त 100 कोटी रुपये होती. या वर्षाच्या जानेवारी महिन्यात या फंडाची संपत्ती 50 हजार कोटी रुपये झाली होती. क्वांट म्यूच्यूअल फंडाच्या पोर्टफोलिओत 26 योजना आणि 54 लाख फोलिओंचा समावेश आहे.

फ्रन्ट रनिंग म्हणजे काय?  

फ्रंट रनिंग ही एक बेकायदेशीर कृती आहे. या प्रक्रियेत फंड मॅनेजर किंवा ब्रोकरला भविष्यातील मोठ्या ट्रेडबद्दल अगोदरच कल्पना असते. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रेड्समध्ये मॅनेजर किंवा ब्रोकर्स अगोदरच गुंतवणूक करून ठेवतात आणि मोठा नफा कमवतात.  

सेबीला फ्रन्ट रनिंगचा संशय

सेबीने आपल्या टीमच्या माध्यमातून क्वांट म्यूच्यूअल फंडात करण्यात आलेल्या कथित संशयास्पद ट्रेडिंग पॅटर्नला ओळखले होते. त्यानंतर सेबीने क्वांट म्यूच्यूअल फंड हाऊसवर लक्ष ठेवले होते. म्यूच्यूअल फंडातील फ्रन्ट रनिंग रोखण्यासाठी सेबीने कठोर नियमावली केलेली आहे. गेल्या काही काळापासून त्यामुळेच सेबीकडून अशा प्रकारच्या प्रकरणांत कठोर कारवाई केली जाते.

गेल्या पाच वर्षांत या फंडाने चांगली कामगिरी केलेली आहे. हा स्मॉल कॅप फंड सध्या 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त फंडाला मॅनेज करतो. या फंडाच्या पोर्टफोलिओत बड्या कंपन्याचे शेअर्स आहेत. सेबीने केलेल्या या कारवाईचा फटका गुंतवणूकदारांना बसू शकतो. तसेच या फंडाबाबतची विश्वासार्हताही कमी होऊ शकते. खरंच गुंतवणूकदारांना नुकसान झाले का ? हे भविष्यात लवकरच कळेल.

दरम्यान, क्वांट म्यूच्यूअल फंडाने या कारवाईनंतर स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही सेबीला सर्व बाजूंनी सहकार्य करू, असे या फंडाने सांगितले आहे. 

हेही वाचा :

बड्या सरकारी कंपनीचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता, आपल्याला पुन्हा एकदा HMT चे घड्याळ दिसणार?

बँकेत आरडी करताय? 'या' दोन गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर होऊ शकतो मोठा तोटा!

सोमवार तुमच्यासाठी ठरू शकतो लकी! फक्त 'या' दहा पेनी स्टॉक्सवर नजर ठेवल्यास मालामाल होण्याची संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये अपघातग्रस्त बसची आरटीओ पथकाकडून तपासणीTop 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 Dec 2024 : 05 PMKalyan : 58 बेकायदेशीर इमारतींवर कारवाई; बिल्डरकडून फसवणूक, रहिवाशांना मनस्ताप Special ReportKurla Bus Accident Update : चालकाने मद्यपान केलेलं नाही, बेस्ट महाव्यवस्थापकांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Embed widget