एक्स्प्लोर

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख

कागल शहराच्या हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 3-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह हा 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे. यामुळे महामार्गावरून जाणारी लांब अंतराची अवजड वाहतूक वरून जाईल.

6 Lane Elevated Corridor with Service Road Approved in Kagal: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-48 (NH-48) वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या (उन्नत मार्ग) बांधकामाला मंजुरी देण्यात आली असून, यासाठी 357.99 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

काय आहे प्रकल्प?  

कागल शहराच्या हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 3-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह हा 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे. यामुळे महामार्गावरून जाणारी लांब अंतराची अवजड वाहतूक वरून (एलिव्हेटेड मार्गावरून) जाईल, तर स्थानिक वाहतूक खालच्या सर्व्हिस रोडवरून सुरळीतपणे सुरू राहील. NH-48 हा दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई यांसारख्या महानगरांना जोडणारा 'गोल्डन क्वाड्रिलॅटरल'चा मुख्य भाग आहे. कागलमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात होते, त्यातून सुटका होईल.

आर्थिक सुबत्तेचा मार्ग

नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात राष्ट्रीय महामार्ग-48 वर दोन्ही बाजूस 3-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामासाठी 357.99 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग-48 हा भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल (GQ) महामार्ग नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून तो दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई या प्रमुख शहरांना जोडतो. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे 5-स्टार एमआयडीसी (MIDC) औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात व्यापार व उद्योग झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असून प्रचंड वाहतूक कोंडी व प्रदूषणातही वाढ होत आहे. याचा परिणाम आपातकालीन सेवांवर देखील होत आहे.

उपरोक्त मंजूर करण्यात आलेल्या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब अंतराची जलद वाहतूक वेगळी होणार असून स्थानिक वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी व मालवाहतुकीसाठी गतीमान व सुरक्षित प्रवास शक्य होईल. तसेच इंधन बचत होऊन प्रवासाचा वेळही कमी होईल. परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या उन्नत महामार्गामुळे या भागातील उत्पादकता वाढेल, आर्थिक सुबत्ता वाढेल व आपातकालीन सेवा कार्यक्षमतेने पुरवता येतील. यामुळे देशांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल.

फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख! कागलमध्ये ₹357.99 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर! कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी!  ₹357.99 कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून उद्योग व मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देणाऱ्या या निर्णयाबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व आमचे नेते, मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचे मन:पूर्वक आभार!

इतर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Embed widget