10 लाख गुंतवा 20 लाख मिळवा, SBI मध्ये गुंतवणूक केल्यास असा मिळेल फायदा?
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आहे. या बँकेत FD केल्यास ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा मिळतो. कारण ठेवीवर या बँकेत चांगला व्याजदर मिळत आहे.
SBI Investment : भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना दोन गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. एकरत गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षीत आहे का? आणि दुसरं म्हणजे त्यावर किती परतावा मिळतो. जास्त परतावा मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आहे. या बँकेत FD केल्यास ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा मिळतो. कारण ठेवीवर या बँकेत चांगला व्याजदर मिळत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ठेवीदारांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवी (FDs) योजनांमध्ये पैसे ठेवता येतात. या बँकांमध्ये ठेवीदारांना कोणतीही जोखीन न घेता निश्चित उत्पन्न मिळू शकते. SBI मध्ये गुंतवणूक केल्यास जेष्ठ नागरिकांना मोठा परतावा मिळत आहे. 10 वर्षाच्या कालावधीसाठी बँकेत ठेवी ठेवल्या तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के व्याजदर मिळतो.
10 लाख गुंतवा, 20 लाख रुपये मिळवा
दरम्यान, नियमित ग्राहकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो. याबाबतची माहिती पाहुयात. तुम्ही जर मुदत ठेवीत 10 लाख रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर तुम्हाला 6.5 टक्के व्याजदर मिळतो. म्हणजे तुम्ही 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 10 वर्षात तुम्हाला 9,05,558 रुपयांचे व्याज मिळते. म्हणजे 10 वर्षानंतर तुम्हाला एकूण 1905558 रुपये मिळतात. मात्र जेष्ठ नागरिसांठी यापेक्षा जास्त परतावा मिळतो. समजा जेष्ठ नागरिकाने देखील 10 वर्षासाठी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली. तर या गुंतणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के व्याज मिळते. म्हणजे 10 वर्षात व्याजाचे पैसे हे 11,02,349 रुपये मिळतात. म्हणजे 10 वर्षानंतर एकूण रक्कम ही 2102349 एवढी मिळते. त्यामुळं जेष्ठ नागरिकांना याचा चांगला फायदा होतो.
ठेवीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी एसबीआयमध्ये गुंतवणूक
दरम्यान, आपल्या ठेवीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्ही एसबीआयमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण एसबीआयमध्ये ठेवलेल्या ठेवी या सुरक्षीत मानल्या जातात. त्यामुळं ठेवीदारांनी कोणतीही जोखीम स्वीकारण्याची गरज नाही. दरम्यान, FD वर मिळणारे व्याज हे करपात्र आहे. त्यामुळं या उत्पन्नावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या: