मोठी बातमी! एसबीआयच्या व्याजदरात वाढ, आता EMI मध्ये होणार वाढ; सामान्यांच्या खिशाला झळ
SBI MCLR Rate : एसबीआय बँकेने आपल्या एमसीएलआर रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.
मुंबई : भारतातील सर्वांत मोठी शासकीय बँक स्टेट बँक ऑफ इंडियने (SBI) आपल्या MCLR दरात (SBI MCLR Rates) वाढ केली आहे. हा एमसीएलआर दर 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्के करण्यात आला आहे. हा नवा एमसीएलआर दर 15 ऑगस्ट 2024 पासून लागू झालेला आहे. एमसीएलआर दरात वाढ झाल्यामुळे आता एसबीआय बँकेचे कर्ज महागणार आहे. गृहकर्ज, कार लोन, शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. एमसीएलआर दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
एमसीएलआर रेटमुळे ईएमआय कसा वाढणार? समजून घ्या....
एनसीएलआर दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाल कशा प्रकारे झळ बसणार हे समजून घेण्यासाठी तुम्ही एसबीआय बँकेकडू दहा लाख रुपयांचे कर्ज घेतलेले आहे, असे समजू या. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी दहा वर्षे आहे म्हणजेच 120 महिने आहे असे समजू. तसेच या कर्जासाठी स्प्रेड दर 1 टक्के आहे. एमसीएलआर दर वाढल्यामुळे नेमका काय फरक पडतो हे समजून घेण्यासाठी आपण जुन्या एमसीएलआर आणि नव्या एमसीएलआर दराने किती ईएमआय येतो हे समजून घेऊ या. स्टेट बँक ऑफ इंडियाचा याआधीचा MCLR दर 8.85 टक्के होता. आता MCLR दर 8.95 टक्के करण्यात आला आहे.
MCLR 8.85 टक्के (व्याज दर 9.85 टक्के)
स्प्रेड 1 टक्के (हा एमसीएलआर दरावर जोडला जाणारा अतिरिक्त व्याजदर अशतो.)
एकूण व्याज दर- 8.85 टक्के + 1 टक्के = 9.85 टक्के
मासिक व्याज दर- 9.85 चक्के / 12 = 0.008208
या व्याज दराने 10 लाख रुपयांच्या कर्जावर 8.85 MCLR टक्के दराने तुमचा EMI 13,227 रुपये होतो.
8.95 टक्के MCLR दरावर किती ईएमआय होणार
MCLR- 8.95 टक्के
स्प्रेड- 1 टक्के
एकूण व्याज दर- 8.95 टक्के + 1 टक्के = 9.95 टक्के
मासिक व्याज दर 9.95 टक्के / 12 = 0.008292
या हिशोबानुसार 8.85 एमसीआलआर रेटनुसार तुम्हाला 13,318 रुपयांचा मासिक हफ्ता येईल.
MCLR दर 8.85 वरून 8.95 झाल्याने तुम्हाला भराव्या लागणाऱ्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. वर केलेल्या काकडेमोडीनुसार दहा लाख रुपयांच्या कर्जावर तुम्हाला प्रत्येक ईएमआयवर 91 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. म्हणजेच 0.10 टक्क्याने जरी MCLR दर वाढला तरी तुमच्या ईएमआयमध्ये वाढ होते.
एसबीआयसह अन्य बँकांनीही वाढवला एमसीएलआर रेट
एसबीआयने एमसीएलआर रेटमध्ये वाढ करण्याअगोदर इतरही बँकांनी आपल्या एमसीएलआर दरात वाढ केलेली आहे. या बँकांचा नवा एमसीएलआर दरदेखील या महिन्यापासून लागू झालेला आहे. एमसीएलआर दर वाढवणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, (Bank Of Baroda), कॅनरा बँक (Canara Bank) आणि यूको बँकेचा (UCO Bank) समावेश आहे.
हेही वाचा :
फक्त 'या' एका योजनेत करा गुंतवणूक, रिटायरमेन्टनंतर कधीच येणार नाही पैशांची अडचण!
नारायण मूर्ती ते अजीम प्रेमजी! भारतातील टॉप टेक अब्जाधीशांची संपत्ती वाचून धक्क व्हाल!