FPO: रुची सोयाची पब्लिक ऑफर, कमाईची मोठी संधी! बाबा रामदेवांनी जाहीर केली तारीख
रुची सोया इंडस्ट्रीजच्या (Ruchi Soya Industries) फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) च्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
Baba Ramdev: रुची सोया इंडस्ट्रीजच्या (Ruchi Soya Industries) फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हा एफपीओ 24 मार्च ते 28 मार्च दरम्यान बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या FPO च्या माध्यमातून सुमारे 4300 कोटी रुपये उभारण्याची पतंजली कंपनीची योजना आहे. रुची सोया इंडस्ट्रीज FPO साठी प्रति शेअर 615 ते 650 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. हा एफपीओ 24 मार्चला बाजारात उपलब्ध होणार असून 28 मार्चला याची विक्री बंद होईल. आपल्या एफपीओबद्दल माहिती देण्यासाठी आज बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आचार्य बाळकृष्ण आणि कंपनीचे इतर अधिकारी उपस्थित होते.
एफपीओबद्दल काय म्हणाले बाबा रामदेव? प्लांटेशन
बाबा रामदेव म्हणाले की, ''अवघ्या काही वर्षांत कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रुची सोयाला एका अशा उंचीवर नेऊन ठेवले आहे, ज्याची कोणी कल्पना ही केली नव्हती. आता एफपीओच्या माध्यमातून कंपनी कर्जमुक्त होईल आणि बाजारात आपली विश्वासार्हता अधिक चांगल्या पद्धतीने वाढवू शकेल. कंपनी पाम प्लांटेशनवरही लक्ष देत आहे. फूड पोर्टफोलिओसाठी व्यावसायिक संभावना लक्षात घेऊन, पतंजली औषध क्षेत्रातही काम करत आहे. रुची सोयाचा FPO आणणे हा या अभियानाचा एक भाग आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून आधी कर्जाची परतफेड केली जाईल. जेणेकरून गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकता येईल.''
पतंजली नवा विक्रम रचत आहे - बाबा रामदेव
बाबा रामदेव म्हणाले की, ''आज पतंजली नवा विक्रम रचत आहे. भारतीय ब्रँडला ग्लोबल करणाऱ्या देशवासीयांचे आभार. आज पतंजलीची 22 उत्पादन युनिट, लाखों शेतकऱ्यांशी जुळत एक राष्ट्रीय चळवळ बनली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात घसरण पाहायला मिळाली. अशातच बाजाराला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी पतंजलीचा हा मोठा प्रयत्न आहे. आम्ही पतंजलीच्या विविध व्यवसायांचे विभागीयकरण करणार आहोत. युक्रेनमधून सूर्यफूल भारतात आयात केली जात होती. खाद्यतेलाच्या क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण नसतो, तर अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असते. खाद्यक्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण पावले उचलली, यासाठी त्यांचे अभिनंदन.''