(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Retirement Planning : रिटायरमेंटनंतरच्या सुखी आयुष्यासाठी 24 टक्के भारतीय करतात गुंतवणूक; अभ्यासातून माहिती समोर
Retirement Planning : भारतीय लोक नोकरीच्या काळात विविध योजना आणि पॉलिसींमध्ये गुंतवणूक करत असताना, केवळ 24 टक्के लोकांनी त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार केला आहे.
Retirement Planning : सेवानिवृत्तीच्या दरम्यान अनेक जणांचे रिटायरमेंटचे अनेक प्लॅन्स ठरलेले असतात. यामध्ये वाढती महागाई, तुमचं आर्थिक गणित यांसारख्या इतर बऱ्याच गोष्टी असतात. मात्र, अजूनही काही जणांच्या टॉप प्रायोरिटीमध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग अद्यापही नाही. असे मॅक्स लाइफ इन्शुरन्स, इंडिया रिटायरमेंट इंडेक्स नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे.
भारतीय लोक नोकरीच्या काळात विविध योजना आणि पॉलिसींमध्ये गुंतवणूक करत असताना, केवळ 24 टक्के लोकांनी त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार केला आहे, असे मॅक्स लाइफ इन्शुरन्स, इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडीच्या अलीकडील अभ्यासातून समोर आले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये भारतातील 28 वेगवेगळ्या शहरांमध्ये 35-65 वर्षे वयोगटात आयोजित करण्यात आला होता.
या संदर्भात मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत त्रिपाठी म्हणतात, “जसं वाढतं त्यानुसार आरोग्याच्या समस्या वाढू लागतात. साथीच्या रोगामुळे तीव्र झालेल्या, तसेच अलीकडच्या काळातील आर्थिकदृष्ट्या कमी वेतन वाढ, आर्थिक अनिश्चितता आणि नोकऱ्यांचे नुकसान यांसारखे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी वैयक्तिक, घरगुती उत्पन्नावर याचा परिणाम होतो. म्हणूनच, रिटायरमेंटचे प्लॅनिंग गरजेचे आहे."
या अभ्यासात असे दिसून आले आहे की भारताचा सेवानिवृत्ती निर्देशांक अभ्यास (IRIS) 44 वर आहे, ज्यामध्ये आरोग्य आणि आर्थिक स्थिती आणि भविष्य याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
'हा' असतो सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याचा उद्देश
- जे लोक सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक करतात, त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक लोक आरोग्य आणि वैद्यकीय खर्चासाठी गुंतवणूक करतात.
- 63 टक्के लोकांना सेवानिवृत्त दरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत करणे महत्त्वाचे वाटते, तर क्वचितच 8 टक्के लोकांनी भावनिक आधारासाठी गुंतवणूक केल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.
- जवळपास 47 टक्के भारतीय ‘आर्थिक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहता कामा नये’ यासाठी गुंतवणूक करतात, तर 38 टक्के ‘सेवानिवृत्तीदरम्यान जीवनशैली राखण्याच्या’ उद्देशाने गुंतवणूक करतात.
शहरी भागांत आर्थिक तयारीचा अभाव
बहुतांश शहरांमध्ये निवृत्तीसाठी आर्थिक तयारी कमी आहे. जरी, सेवानिवृत्त जीवनातील सर्वात गंभीर पैलू म्हणून आरोग्य ओळखले गेले असले तरी, बहुतेक सर्वेक्षणकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांत आरोग्य तपासणी केली नाही. 41-45 वयोगटातील लोकांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती सर्वाधिक आहे (या वयोगटातील 50 टक्क्यांहून अधिक लोक गेल्या तीन वर्षांत तपासणीसाठी गेलेले नाहीत). असे आढळून आले.
महत्त्वाच्या बातम्या :