Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट बँकेत नवी खाती उघडण्यावर RBI चे निर्बंध
RBI Update: पेटीएम बँकेत आता नव्या ग्राहकांना खातं उघडण्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंदी घातली आहे. त्यांना आयटी ऑडिट करण्याचे आदेशही आरबीआयने दिले आहेत.
Paytm Payments Bank : नोटबंदीनंतर पेटीएम (Paytm) सारख्या युपीआय अॅप्सना अच्छे दिन आले. पेटीएमने नंतर बँकिंग सुविधा ग्राहकांना देत पेटीएम पेमेंट बँकची (Paytm Payment Bank) सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केली. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नव्या आदेशांमुळे सध्यातरी पेटीएम पेमेंट बँकेत नवी खाती उघडता येणार नाहीत. आरबीआयने पेटीएम कंपनीला आयटी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. आयटी ऑडिट म्हणजे कंपनीचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर. ज्यानुसार अॅपचं संपूर्ण सॉफ्टवेअरची नीट तपासणी करुन बँक किती ग्राहकांचा भार उचलण्यास सक्षम आहे, त्यात काय त्रुटी आहेत आणि त्या का येत आहेत, या सर्व गोष्टींची चौकशी केली जाणार आहे.
आरबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीत सांगतलं आहे की,"पेटीएम पेमेंट्स बँकेला आता नवीन ग्राहक जोडण्यासाठी आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसंच कंपनीच्या आयटी ऑडिटचा रिपोर्ट आरबीआयला दाखवल्यानंतरच नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी पेटीएम पेमेंट्स बँकेला मिळणार आहे.'' ही सर्व अॅक्शन आरबीआयनं नेमकी का घेतली आहे, हे स्पष्ट झालं नसलं तरी आरबीआयने देखरेखीच्या कारणांमुळे (Supervisory Concerns) हे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे.
पेटीएम स्मॉल फायनान्समध्येही येणार?
पेटीएम पेमेंट बँक या वर्षाच्या मे-जून महिन्यापर्यंत स्मॉल फायनान्स बँकसाठी आवेदन जमा करण्याची शक्यता असल्याची चर्चाही बाजारात मागील काही काळापासून आहे. पण आता आरबीआयच्या या नव्या आदेशांमुळे पेटीएमच्या कारभारावर काय परिणाम होणार हे पाहावे लागेल. पेटीएम पेमेंट बँकेच्या कारभाराचा विचार करता डिसेंबरपर्यंत तब्बल 92.6 कोटी UPI ट्रांजॅक्शनसह इतकी मोठी उलाढाल करणारी पेटीएम देशातील पहिलीच बेनिफिशियरी बँक आहे.
हे ही वाचा -
- Paytm : आता रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्यासाठी देखील होणार पेटीएमचा उपयोग, असे करा बुकिंग
- Paytm: पेटीएम देणार घरबसल्या पाच लाखांपर्यंत स्वस्त कर्ज, असा करा अर्ज
- Paytm Health ID : पेटीएम अॅपवर Health ID बनवा, सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये सहभागी व्हा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha