(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paytm: पेटीएम देणार घरबसल्या पाच लाखांपर्यंत स्वस्त कर्ज, असा करा अर्ज
Paytm Loan Offer : पेटीएमच्या या खास कर्जाचा फायदा लहान व्यापाऱ्यांना होणार असून घरबसल्या कर्जाची ही प्रक्रिया करता येणं शक्य आहे.
Paytm Loan Offer : डिजिटल पेमेंटची सेवा देणारे पेटीएम आता पाच लाख रुपयांपर्यंतचे स्वस्त कर्ज देणार आहे. हे कोलॅटरल फ्री कर्ज आणि खास डेली ईएमआय असलेलं प्रोडक्ट बाजारात आणण्यासाठी पेटीएमने काही शेड्यूल्ड कमर्शिअल बँका आणि एनबीएफसी सोबत भागिदारी केली आहे. या कर्जाचा फायदा हा लहान व्यापाऱ्यांना होणार आहे.
पेटीएमचे हे स्वस्त कर्ज पेटीएम बिझनेस अॅपच्या (Paytm for Business app) मर्चंट लेंडिंग प्रोग्रॅम (Merchant Lending Program) या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी मदत मिळणार आहे. व्यापाऱ्यांच्या डेली ट्रान्जेक्शनच्या आधारावर कर्जाची सीमा आखण्यात येणार आहे आणि त्या आधारित प्री-क्वॉलिफाईड कर्ज देण्यात येणार आहे.
संपूर्ण प्रक्रिया डिजिटल
या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल स्वरुपाची असेल. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांची काही आवश्यकता नाही. एखाद्याला किती कर्ज द्यायचं हे त्या व्यापाराच्या रोजच्या सेटलमेन्टवर किंवा ट्रान्जेक्शनवर ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतेही प्री-पेमेंट चार्ज आकारले जाणार नाही.
कर्ज मिळवण्यासाठी या पाच सोप्या स्टेप्स फॉलो करा,
- पेटीएम बिझनेस अॅपच्या (Paytm for Business app) वरील 'बिझनेस लोन' वर क्लिक करा.
- त्यामध्ये आपल्या गरजेनुसार कर्जाची रक्कम भरा. त्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या कर्जावरील व्याज, ईएमआय, कालावधी आणि इतर माहिती जाणून घ्या.
- या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर “Get Started" वर क्लिक करा. त्यानंतर कर्जाची प्रक्रिया सुरू होईल.
- त्यापुढील स्क्रीनवर आपले पॅन डिटेल्स, जन्म तारीख, ई-मेल अशा स्वरुपाची माहिती भरा. पॅन डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोरची चौकशी केली जाईल आणि केवायसी डीटेल्सची पुष्टी केली जाईल.
- कर्जाचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज तुमच्या अकाऊंटवर जमा होईल.
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपले सर्व डीटेल्स व्यवस्थित तपासून घ्या आणि मगच अर्ज करा.
महत्त्वाच्या बातम्या:
- Paytm Health ID : पेटीएम अॅपवर Health ID बनवा, सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये सहभागी व्हा
- LPG Cylinder : चांगली बातमी! 'या' महिन्यात गॅस सिलिंडर बुक करा, पुढील महिन्यात पैसे द्या
- इंटरनेट कनेक्शन शिवाय 'टॅप टू पे' द्वारे करा सुरक्षित पेमेंट, PayTm ची ग्राहकांसाठी नवी सुविधा