एक्स्प्लोर
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
Gold Prices In 2025 Update: सोने दरात 2024 मध्ये जवळपास 30 टक्क्यांची वाढ झाली होती. 2025 मध्ये देखील सोने दरात वाढ होऊ शकते.
सोने दरात तेजी कायम राहणार
1/5

Gold Prices At New High मुंबई : 2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाचं वातावरण आणि आर्थिक क्षेत्रातील अनिश्चिततेचं वातावरण पाहता 2025 मध्ये सोनं 90 हजार रुपयांचा टप्पा ओलांडू शकतं. 10 ग्रॅम सोन्याचे दर 2024 मध्ये 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. 1 जानेवारी 2024 ला सोन्याचे दर 63000 रुपयांच्या दरम्यान होते. वर्ष संपताना सोन्याच्या दर 79000 रुपयांच्या आसपास आहेत.
2/5

कमोडिटी मार्केटच्या एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार 2025 मध्ये सोन्याच्या दरात तेजी राहू शकते. जागतिक क्षेत्रातील अनिश्चिततेचं वातावरण आणि मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदी केली जात असल्यानं सोने दरात वाढ होऊ शकते.
Published at : 31 Dec 2024 03:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























