एक्स्प्लोर

वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?

मंत्री धनजंय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे.

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सीआयडीने त्याला अटकही केली आहे. पुणे सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराडची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी बीड सीआयडीचे डीवायसी आहेत, जे या गुन्ह्याचा तपास करतात त्यांच्याकडे कराडची रवानगी करण्यात आली आहे. या अटकेनंतर प्रथमच सीआयडीचे (CID) पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  

वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. तसेच, मंत्री धनजंय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. कारण, वाल्मिक कराडने शरणागती पत्कारण्यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली असून स्वत:च्या खासगी कारने तो सीआयडी कार्यालयात हजर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, पोलिसांना तो फरार असताना सापडला कसा नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता, सीआयडी पोलिसानी प्रथमच याबाबत माहिती दिली.  

आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान केस पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं एफआयआर नंबर 638/2024 च्या मधील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडी मुख्यालयात हजर झालेला आहे. त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतलं असून त्याची थोडीफार चौकशी करुन त्याला बीडकडे रवाना करण्यात आले आहे. आरोपी वाल्मिक कराडला आमच्या टीमसह बीडचे तपासी अंमलदार जे आहेत, बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता बंदोबस्तात बीडकडे रवाना करण्यात आलं असल्याचं सारंग आव्हाड यांनी सांगितलं. तसेच, पुढची तपासणी गुजर हेच करतील, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, सीआयडी पोलिसांनी या घटनेवर अधिक प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

 काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की, फार काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यावर जायचं नाही. त्याचं समर्थन करायचं नाही आणि विरोधही करायचा नाही. विरोधाकांनी राजकारण करत राहावे. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे की, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget