Reliance Retail partners with Gap Inc : रिलायन्सचा अमेरिकन फॅशन ब्रँड गॅप इंकसोबत करार
Reliance Retail partners with Gap Inc : गॅप हा अमेरिकन प्रसिद्ध ब्रॅंड आहे. हा ब्रॅंड महिला आणि मुलांसाठी कपडे, अॅक्सेसरीजसह इतर उत्पादने बनवते. ही उत्पादने आता भारतात देखील मिळणार आहेत.
Reliance Retail partners with Gap Incवे : रिलायन्स रिटेलने ( Reliance Retail) अमेरिकन फॅशन ब्रँड गॅप इंकसोबत (Gap Inc) करार केला आहे. या करारामुळे रिलायन्स रिटेल भारतातील गॅप या ब्रॅंडचा अधिकृत रिटेलर बनला आहे. रिलायन्सकडून नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. गॅप इंक या ब्रँडच्या फॅशनशी संबंधित वस्तू आहेत.
गॅप हे महिला आणि मुलांसाठी कपडे, अॅक्सेसरीजसह इतर उत्पादने बनवते. ही कंपनी 1969 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापन करण्यात आली. डेनिम आधारित फॅशनसाठी जगभरात गॅपची ओळख आहे.
"रिलायन्स रिटेलमध्ये आमच्या ग्राहकांसाठी नवीन आणि सर्वोत्तम ब्रॅंड आणल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला आमच्या फॅशनचा अभिमान असून पोर्टफोलिओमध्ये प्रतिष्ठित अमेरिकन ब्रँड गॅपसोबत करार करत असल्याची घोषणा करत असताना आम्हाला आनंद झाला आहे. रिलायन्स आणि गॅप त्यांच्या ग्राहकांसाठी उद्योगातील आघाडीची फॅशन उत्पादने एकत्र आणण्याच्या त्यांच्या व्हिजनमध्ये एकमेकांना पूरक आहेत, अशी माहिती , रिलायन्स रिटेलचे सीईओ अखिलेश प्रसाद यांनी दिली.
"आम्ही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये गॅपचा व्यवसाय वाढविण्यासाठी उत्सुक आहोत. भारतातील रिलायन्स रिटेल सारख्या प्रादेशिक कंपनीसोबत भागीदारी केल्यामुळे आम्हाला आमचा ब्रँड आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल, असे मत गॅप इंकचे व्यवस्थापकीय संचालक अॅड्रिन गेर्नंड यांनी या करारानंतर व्यक्त केले.
गॅपने ऑनलाइन तसेच कंपनी-संचलित फ्रँचायझी स्टोअरद्वारे जगभरात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. रिलायन्स रिटेल भारतात गॅपचे तरुण, पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी खरेदीचा उत्साही अनुभव घेऊन येत आहेत. गॅपच्या उत्पादनांना जगभरातून पसंती मिळत आहे. गॅप हा अमेरिकेत नावाजलेला ब्रॅंड आहे.
अॅडल्ट अॅपेरल आणि अॅक्सेसरीज, गॅप टीन, गॅप किड्स, बेबीगॅप, गॅप मॅटर्निटी, गॅप बॉडी, गॅपफिट, येझी गॅप आणि गॅप होम कलेक्शन यांचा गॅपच्या उत्पादनात समावेश आहे. गॅप आपल्या ग्राहकांना गॅप फॅक्टरी स्टोअर्स आणि गॅप आऊटलेट्सद्वारे खास डिझाइन केलेली फॅशन देखील देते.