एक्स्प्लोर

शेअर बाजार कोमात, 'ही' कंपनी जोमात, एका वर्षात 570 टक्क्यांनी रिटर्न्स; आता गुजरातमध्ये 200 कोटी गुंतवणार!

RBM Infracon : या कंपनीने मोठा करार केला आहे. या करारअंतर्गत ही कंपनी गुजरातमध्ये एका प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये गुंतवणार आहे.

RBM Infracon Update: जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झालेला दिसतोय. कालच्या सत्रात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले. काही शेअर्सचे मूल्य कमी होत असले तरी दुसरीकडे काही कंपन्या मात्र चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर आरबीएम इन्फ्राकॉन या कंपनीने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच या कंपनीने अत्पादनवाढीसाठी इतर कंपनीशी कोट्यवधींचा करार केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये भविष्यात मोठ्या घडामोडी दिसू शकतात. 

आरबीएम इन्फ्राकॉन या कंपनीने नेमकी काय घोषणा केली? 

आरबीएम इन्फ्राकॉन या कंपनीने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. या कंपनीने गुजरातमध्ये जामनगर आणि कच्छ येथे 15 मेगावॅट क्षमतेच्या उर्जानिर्मितीचा प्रकल्प उभा करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी या कंपनीकडून 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या कंपनीने इलेक्ट्रोलायझर्सच्या पुर्ततेसाठीक ग्रीनझो एनर्जी या कंपनीशी करारदेखील केला आहे. कंपनीने केलेल्या या घोषणांनंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.  

टप्प्याटप्प्याने प्रकल्प कार्यान्वित होणार 

कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगनुसार हा प्रकल्प जानेवारी-मार्च 2025 मध्ये सुरु होणार आहे. हा प्रकल्प 18 महिन्यांत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल. आरबीएम इन्फ्राकॉमचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक जे बी मणी यांनी या प्रकल्पाविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार या प्रकल्पासाठी सरकाररी यंत्रणांची परवानगी घेण्यासाठी कमीत कमी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर या प्रकल्पावर काम चालू होईल.   

1200 कोटी रुपयांची ऑर्डर बुक  

आरबीएम इन्फ्राकॉनच्या नव्या प्रकल्पाला टप्प्याटप्प्यात लागू केले जाईल. कंपनीने सांगितल्यानुसार या कंपनीकडे सध्या 1,200 कोटी रुपयांच्या ऑर्डर बुक आहेत. या ऑर्डरसंदर्भात या वर्षाच्या डिसेंबरपासून पुरवठा चालू होईल. 

एका वर्षात दिले 570 टक्क्यांनी रिटर्न्स

दरम्यान, शुक्रवारी सत्रादरम्यान, Rbm Infracon Limited या कंपनीचा शेअर पाच टक्क्यंनी वाढला. या शेअरमध्ये 49 अंकांची वाढ झाली. शुक्रवारी या कंपनीचा शेअर 1,029.80 रुपयांवर पोहोचला. या कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 1,029.80 रुपये आहे. तर 52 आठवड्यातील निचांकी मूल्य 161.25 रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीने आपल्ाय गुंतवणूकदारांना 71.63 टक्के तर गेल्या एका वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 570.44 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 869.25 कोटी रूपये आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
 
हेही वाचा :

30000 लोकांची फसवणूक, 500 कोटींचा घोटाळा, एल्विश यादव, रिया चक्रवर्तीला नोटीस आलेला HIBOX Scam काय आहे?

8 ऑक्टोबरला येणार 264 कोटींचा आयपीओ; पैसे कमवण्याची हीच नामी संधी!

'लाडकी बहीण'चा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार, जाणून घ्या पैसे मिळण्यासाठी किती दिवस राहिले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 8 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMVA Leaders meets CM Fadanavis : विधानसभा उपाध्यक्ष , विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :9 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Embed widget