एक्स्प्लोर

RBI Meeting : रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू; व्याज दर वाढण्याची शक्यता

RBI Meeting : रिझर्व्ह बँकेची तीन दिवसीय पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू झाली आहे. या बैठकीत रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

RBI Meeting : भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेची (RBI MPC meeting) ही बैठक तीन दिवस असून 5 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून 5 ऑगस्ट रोजी नवीन पतधोरण जाहीर केले जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील नवीन निर्णयाची माहिती देतील. 
 
व्याज दर वाढण्याची शक्यता का?

एका अहवालानुसार, देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्याच्या वर्षात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने  व्याज दरात 2.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्या तुलनेत भारतात आरबीआयने व्याज दरात फारशी वाढ केली नाही. त्यामुळे आरबीआय आणखी व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. 

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते. 

याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला.  त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर आता 5 ऑगस्ट रोजी आरबीआय रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची शक्यता आहे. 

>> रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
Embed widget