Sovereign Gold Bond: सोन्यात गुंतवणूक करायचीये? सरकार विकतंय स्वस्तात सोनं, काय आहेत फायदे?
Sovereign Gold Bond News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच सॉवरेन गोल्ड बॉन्डचा तिसरा टप्पा लॉन्च करणार आहे. जर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आजपासून पैसे गुंतवू शकता.
Sovereign Gold Bond: तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायचीये का? मग अजिबात वेळ घालवू नका. केंद्र सरकार (Central Government) अगदी स्वस्तात सोनं विकतंय. विश्वास नाही ना बसला. आजपासून म्हणजेच, सोमवार 19 डिसेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) जारी करणार आहे. त्यामुळे तुम्ही सोन्यात गुंतवणूक (Investment in Gold) करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी अजिबात गमावू नका.
अर्थ मंत्रालयानं (Ministry of Finance) दिलेल्या माहितीनुसार, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स 2022-23 चा तिसरा टप्पा 19 ते 23 डिसेंबर 2022 दरम्यान सुरू होत आहे. या योजनेचा पुढील टप्पा मार्च 2023 मध्ये ओपन होणार आहे. त्यावेळी तुम्ही हा बाँड 6 मार्च ते 10 मार्च 2022 पर्यंत खरेदी करू शकता. जर तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही RBI नं जारी केलेल्या या गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गोल्ड बॉन्ड्ससाठी इश्यू प्राईज 5,409 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे.
स्वस्त सोनं कसं खरेदी कराल?
गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme) अंतर्गत, केंद्र सरकार वर्षातून अनेक वेळा सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना (Sovereign Gold Bond Scheme) आणतं. यापूर्वी, सरकारनं ऑगस्ट 2022 मध्येही गोल्ड बॉन्ड स्कीम (Gold Bond Scheme) आणली होती. या योजनेंतर्गत, तुम्ही तुमचे पैसे सोन्यात गुंतवून जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता. सरकार ठराविक कालावधीनंतर ही योजना सुरू करत असते. यामध्ये आरबीआय (Reserve Bank of India) ग्राहकांना मर्यादित कालावधीसाठी सबस्क्रिप्शन घेण्याची परवानगी देते. हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. कारण, या गोल्ड बॉन्डला सरकारी गॅरेंटीही असते.
किती सोनं खरेदी करू शकता?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत गुंतवणूक करू शकते. तसेच हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धार्मिक संस्था गुंतवणूक करू शकतात. एक व्यक्ती 4 किलो सोने खरेदी करू शकते. त्याचबरोबर कोणत्याही संस्था, कंपनी आणि ट्रस्टला 2 किलोपेक्षा जास्त सोने खरेदी करावं लागतं.
SBGची किंमत आणि त्यावर मिळणारं व्याज
सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत, गुंतवणूकदाराला 999 शुद्धतेचं सोनं खरेदी करण्याची संधी मिळते. तुम्ही हे गोल्ड बॉन्ड ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (Offline) दोन्ही पद्धतीनं खरेदी करू शकता. या योजनेअंतर्गत सोन्यात गुंतवणूक केल्यास, तुम्हाला वार्षिक आधारावर 2.50% निश्चित परतावा मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर खात्यात जमा केलं जातं. व्याज म्हणून मिळालेली रक्कम आयकर कलम 1961 अंतर्गत करपात्र आहे. जेव्हा तुम्ही या योजनेअंतर्गत सोनं विकता तेव्हा तुम्हाला त्यावेळच्या किमतीनुसार किंमत आणि व्याज दोन्हीचा लाभ मिळेल. या योजनेत तुम्ही तुमचे पैसे एकूण 8 वर्षांसाठी गुंतवू शकता.
कुठे खरेदी करता येणार गोल्ड बॉन्ड?
सॉवरेन गोल्ड बॉन्ड बँका (स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका वगळता) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Stock Holding Corporation of India Limited), नामांकित पोस्ट ऑफिस (Post Office) आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज जसे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (National Stock Exchange of India Limited) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड (Bombay Stock Exchange Limited) द्वारे खरेदी केले जाऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
कोणत्याही वस्तूवर कर वाढला नाही, गुटखा-पान मसालाही महागणार नाही, जीएसटी कौन्सिलचा निर्णय