(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, 5 नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचा परवाना रद्द
युएमबी सिक्युरिटीज लिमिटेड, अनश्री फिनव्हेस्ट, चढ्ढा फायनान्स, अॅलेक्सी ट्रेकॉन आणि झुरिया फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थात आरबीआयने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. 5 नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचे (NBFC) नोंदणी प्रमाणपत्र (COR) डिजिटल कर्ज ऑपरेशन्समध्ये आउटसोर्सिंग आणि उचित व्यवहार संहितेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रद्द करण्यात आले आहे.
युएमबी सिक्युरिटीज लिमिटेड, अनश्री फिनव्हेस्ट, चढ्ढा फायनान्स, अॅलेक्सी ट्रेकॉन आणि झुरिया फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. पाच NBFC चे CoRs तृतीय पक्ष अॅप्सद्वारे आयोजित केलेल्या त्यांच्या डिजिटल कर्ज ऑपरेशनमध्ये आउटसोर्सिंग आणि उचित सराव संहितेच्या नियामकांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल रद्द करण्यात आले आहेत असं आरबीआयने सांगितले.
नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण
या कंपन्या जास्त व्याज आकारण्यावरील प्रतिबंधाशी संबंधित विद्यमान नियमांचे पालन करत नाहीत आणि कर्जाच्या वसुलीसाठी ग्राहकांना त्रास देत आहेत असं मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे अलीकडेच आरबीआयने अभ्युजय सहकारी बँकेला ५८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक सूचनांचे पालन न केल्याबद्दल तसंच एनपीएशी संबंधित नियमांमधील त्रुटींचाही समावेश आहे.
आरबीआयने 4 सहकारी बँकांना दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने नियामक अनुपालनातील त्रुटींबद्दल चार सहकारी बँकांना एकूण चार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या चार स्वतंत्र स्टेटमेंटनुसार, हा दंड अनुपालन चुकांसाठी लावण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Small Saving Schemes : खुशखबर! सुकन्या समृद्धी आणि किसान विकास पत्र योजनेवर मिळू शकतो जास्त परतावा , व्याजदर वाढण्याची शक्यता
- RBI : कर्ज पुन्हा महागणार, EMI मध्ये वाढ होणार; आरबीआयचे संकेत
- Cardless Cash Withdrawal: कार्डलेस कॅश काढण्याची ऑफर द्या, आरबीआयच्या बँका-एटीएम ऑपरेटर्सना सूचना