एक्स्प्लोर

RBI कडून पाच बँकांवर बंदी, 'या' बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, तुमचं खातं कोणत्या बँकेत?

RBI Action on Bank : ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे 'या' बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

RBI Ban 5 Co-operative Banks : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून (Bank Account)  पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

बँकांवरील बंदी सहा महिने कायम राहणार

देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने काही सहकारी बँकावर निर्बंध लादले आहेत. बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यामुळे या बँकांचे व्यवहार बंद असतील.  या पाच बँकेचे ग्राहक स्वत:च्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. शिवाय, या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही. आरबीआयने बंदी घातलेल्या पाच पैकी तीन बँकांवर अंशत: ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातली आहे.

'या' बँकांवर बंदी

रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये अकलूज-महाराष्ट्र (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank), एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (HCBL Co-operative Bank), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank Maryadit), शिमशा. सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक (Shimsha Sahakara Bank Niyamitha), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश (Uravakonda Co-operative Town Bank Ltd) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, या बँकांचा समावेश आहे.

'या' बँकांवरील केव्हा बंदी हटणार? 

आरबीआयने एका निवेदनात म्हटलं आहे की, या निर्बंधांचा आढावा घेण्यात येत आहे. या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन हे निर्बंधही हटवण्यात येऊ शकतात, कारण बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही. RBI ने ज्या पाच सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे.

या बँकांच्या व्यवहारांवर आरबीआयने मर्यादा घातली आहे. यानुसार शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र आणि उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, आंध्र प्रदेश या तीन बँकांमधून तुम्ही फक्त 5,000 रुपये काढू शकता. उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवींमधून फक्त 5,000 रुपये काढू शकतात. याचा अर्थ, ग्राहकांच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी ग्राहकांना त्याच्या खात्यातून फक्त 5,000 रुपये काढता येतील. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salary Hikes in 2023 : खूशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर वेतनवाढ, 2023 मध्ये सरासरी 10.3 टक्क्यांनी पगार वाढण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget