एक्स्प्लोर

पीक विम्याशी संबंधित सर्व समस्या आता एका कॉलवर सुटणार, लवकरच सुरु होणार टोल फ्री क्रमांक

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : आता पीक विम्याच्या दाव्याची माहितीसाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. कारण आता लवकरच एक टोल फ्रि क्रमांक येणार आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : विविध योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY). आतापर्यंत सुमारे 37 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती पाहता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा मिळतो. आता या पीक विम्याच्या दाव्याची माहितीसाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. कारण आता लवकरच एक टोल फ्रि क्रमांक येणार आहे. यावर सगळी सविस्तर माहिती मिळणार आहे. 

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अवकाळी पाऊस, वादळ, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होतात. अशा परिस्थितीत शेतकरी त्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत त्यांच्या पिकांचा विमा काढतात, तर विमा कंपन्या त्यांच्या पिकांचा विमा काढताना शेतकर्‍यांना मोठमोठी आश्वासने देतात. परंतू, जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पिकांचे नुकसान होते.  दरम्यान, दावे देताना अनेक वेळा कंपन्या शेतकऱ्यांना अनेक फेऱ्या करायला लावतात. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या अशाच समस्या लक्षात घेऊन, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय एक टोल फ्री क्रमांक जारी करणार आहे. जो फक्त पीक विमा दाव्याच्या समस्या सोडवण्यासाठी असेल. 

पुढील आठवड्यात सुरू होणार टोल फ्री क्रमांक

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत सुमारे 37 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. नैसर्गिक आपत्ती पाहता पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांचा विमा काढला जातो. मात्र पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍यांनी क्लेम केल्यावर त्यांची स्थिती कळवणारे कोणीच नसते. आपला हक्क कधी मिळेल आणि पुढच्या पिकाची तयारी केव्हा होईल, तोपर्यंत शेतकरी वाट पाहू शकतात, पण आता देशातील शेतकऱ्यांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. कारण लवकरच शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलवर सोडवल्या जातील.

छत्तीसगडमध्ये पायलट प्रोजेक्ट यशस्वी

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय टोल फ्री क्रमांक 14447 जारी करेल. या टोल फ्री क्रमांकावरून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसलेले शेतकरी त्यांच्या दाव्याची स्थिती जाणून घेऊ शकतील. तसेच संबंधित तक्रारी करू शकतील. वास्तविक, छत्तीसगडमध्ये त्याचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. त्यानंतर हा नंबर संपूर्ण देशासाठी लॉन्च केला जाईल. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोल फ्री क्रमांक पूर्णपणे तयार असून पुढील आठवड्यात तो सुरू होण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारे ही समस्या दूर होईल

शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या टोल फ्री क्रमांक 14447 वर कॉल करावा लागेल. त्यानंतर विम्याशी संबंधित कागदपत्रे आणि नैसर्गिक आपत्तीची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर त्यांना ओळखपत्र दिले जाईल. एवढेच नाही तर तक्रार नोंदवल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएस मिळणार आहेत. त्यानंतर, जेव्हा शेतकऱ्याला त्याच्या तक्रारीचा पाठपुरावा करायचा असेल, तेव्हा त्याला कॉल करून त्याचा आयडी सांगावा लागेल, त्यानंतर त्याला संपूर्ण स्थिती मिळेल.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Embed widget