एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा होणार का? केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर?

आठवा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तशा आशयाची पत्रंही सरकारला देण्यात येत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात या आयोगाबाबत काही घोषणा होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

8th Pay Commission: सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू आहे. आगामी दीड वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. प्रत्येक दहा वर्षांनी सरकारतर्फे नवा वेतन आयोग लागू केला जातो. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016  मध्ये लागू करण्यात आला होता. म्हणजेच आता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2016 मध्ये लागू केल्या जातील. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत तयारी चालू खरू शकते. आर्थिक वर्ष 2024-25 साठीच्या अर्थसंकल्पात या आठव्या वेतन आयोगाबाबत काही घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. 

एक कोटीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा

आठव्या वेतन आयोगाची केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. हा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी केली जात आहे. जॉइंट कन्सल्टिव्ह मशिनरी फॉर सेन्ट्रल गव्हर्नमेंट एम्पलॉइजच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यांनीदेखील आपल्या या पत्रात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे.  आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यावर देशभरातील साधारण 49 लाख शासकीय कर्मचारी तसेच 68 लाख पेन्शनधारकांना म्हणजेच साधारण 1 कोटीपेक्षा अधिक लोकांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फायदा होणार आहे. 

23 जुलै रोजी सादर होणार अर्थसंकल्प 

अर्थमंत्री नीर्मला सीतारामन येत्या 23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगाची स्थापना करावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पात या वेतन आयोगाबाबत काही घोषणा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

फिटमेंट फॅक्टरवर ठरणार पगार 

आठव्या वेतन आयोगाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात शिफारश केली जाते. यावेळी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचे आयोगातर्फे सांगितले जाऊ शकते. फिटमेंट फॅक्टरच्या मदतीनेच कर्मचाऱ्यांचा पगार, पे मॅट्रिक्स ठरवला जातो.  
यावेळी फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो.

पगार नेमका किती वाढणार?

काही दिवसांपूर्वीच्या फायनॅन्शिल एक्स्प्रेसमधील एका रिपोर्टनुसार  यावेळी फिटमेंट फॅक्टर 3.68 पट निश्चित केला जाऊ शकतो. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आठ हजार रुपयांची वाढ होऊ शकते. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमीत कमी मूळ वेतन 18,000 हजार रुपयांनी वाढून थेट 26,000 रुपये होऊ शकते. तर मूळ वेतन, महागाई भत्ता आदी मिळून कर्मचाऱ्यांच्या पगारात 25-35 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सातव्या वेतन आयोगात 2.57 पट फिटमेंट पॅक्टर निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर कमीत कमी मूळ वेतन 18 हजार रुपये झाले होते.

हेही वाचा :

बजेट सादर होताच 'हे' तीन स्टॉक तुम्हाला करणार श्रीमंत? वाचा सविस्तर

तब्बल 3.50 लाख रुपये किलोंचा आंबा, बागेत लावला CCTV; भारतातल्या 'या' आंब्याची जगभरात चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशाराKangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाहीRaj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget