PM-KISAN 20th instalment update: 9 कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी; पीएम किसानचा 20 वा हप्ता 'या' दिवशी येण्याची शक्यता
PM-KISAN 20th instalment update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना भारतभरातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य प्रदान करते.

मुंबई: पंतप्रधान किसान निधीचा 20 वा हप्ता कधी (PM kisan 20th instalment update) जमा होणार? याची प्रतिक्षा देशातील शेतकऱ्यांना आहे. पण त्यांच्यासाठी एक खुशखबर समोर आली आहे. कारण, पीएम किसानचा हफ्ता कधी जमा होणार याची तारीख समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 मध्ये (PM kisan 20th instalment update) शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. आता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येऊ शकते. या योजनेचे 10 कोटी लाभार्थी 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 20 जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम 10 कोटी 4 लाख 67 हजार 693 शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 20 जून 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. तथापि, सरकारकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. अहवालांनुसार 9 कोटींहून अधिक शेतकरी 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाभार्थ्यांना त्यांचे ईकेवायसी, आधार सीडिंग आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी पूर्ण झाल्याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पीएम किसान ही एक केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000/- रुपये उत्पन्न सहाय्य दिले जाईल.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती
शेतकरी अधिकृत पीएम-किसान वेबसाइट (https://pmkisan.gov.in/) वर त्यांच्या लाभार्थींची स्थिती आणि पेमेंट अपडेट तपासू शकतात.
स्थिती कशी तपासायची?
https://pmkisan.gov.in ला भेट द्या.
'तुमची स्थिती जाणून घ्या' किंवा 'लाभार्थी यादी' वर क्लिक करा.
आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
ओटीपी पडताळणी पूर्ण करा.
ईकेवायसी पूर्ण करा
जमिनीच्या नोंदी तपासा
आधार-बँक लिंकेजची खात्री करा
सरकार लवकरच अधिकृत माहिती देऊ शकते. शेतकऱ्यांनी मदतीसाठी पीएम-किसान वेबसाइट तपासावी किंवा त्यांच्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

















