भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार
इराण आणि इस्रायल युद्धाचा (Iran Israel War) परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतातही पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Prices) वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Petrol Diesel Prices : इराण आणि इस्रायल युद्धाचा (Iran Israel War) परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या युद्धामुळं तेलाच्या किमंतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळं भारतात देखील पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Prices) वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ
सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुरुवातीला 2 टक्के किंमती वाढल्या होत्या. त्यानंतर लगेच काही दिवसातच कच्च्या तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. आपण आखाती देशांसह रशियाकडून देखील कच्चे तेल आयात करतो. त्यामुळं भारतात येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतातसह जगभरात याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ उतार सुरु
सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ उतार सुरु आहे. गेल्या काही दिवसापूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली होती. तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाल्याची माहिती एता अहवालात देण्यात आली होती. यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांनी कमी करण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. पण आता अशातच कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या जरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इराणचे हल्ले रोखण्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागली
हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाहला मारला गेल्यानंतर संतापलेल्या इराणनं इस्रायलवर हल्ला केला आहे. इराणनं मंगळवारी इस्रायलवर 180 ते 200 हाय स्पीड बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली. इस्रायलचं आर्थिक नुकसान करण्यासाठी घडवण्यात आलेला हा हल्ला जवळपास फेल झाल्यात जमा आहे. वेस्ट बँक परिसरात एकाचा मृत्यू झाला आहे. इराणनं डागलेला बहुतांश क्षेपणास्त्रं इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमनं हवेतच नष्ट केलं. काही क्षेपणास्त्रांचे तुकडे जमिनीवर पडले. पण इराणचे हल्ले रोखण्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागली. याआधी एप्रिलमध्ये इराणनं शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीनं इस्रायलवर हल्ला चढवला होता. इराणनं इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इमाद आणि गदर क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या वेगाच्या सहा पट आहे. इराणमधून गदर क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते अवघ्या 12 मिनिटांत इस्रायलला पोहोचते. या क्षेपणास्त्राचा वेग 7400 किलोमीटर प्रतितास इतका आहे. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी यापेक्षाही वेगवान असलेल्या फतह-2 क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचं इराणकडून सांगण्यात आलं आहे. फतह-2 हायपरसॉनिक क्षेपणास्त्र असून त्याचा कमाल वेग 16000 किलोमीटर प्रतितास इतका अतिप्रचंड आहे.
महत्वाच्या बातम्या:
इराण-इस्रायल यांच्यातील तणावाचा भारताला फटका? निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार?