एक्स्प्लोर

Harshvardhan Patil: इंदापुरात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी? हर्षवर्धन पाटलांकडून तुतारी फुंकण्याचे संकेत; शरद पवार भाकरी फिरवणार, घडामोडींना वेग

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या लेकीने स्टेटवर तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवारांच्या पक्षाचे चिन्ह ठेवल्याचं दिसून आलं आहे. यामुळे आता इंदापूर मतदारसंघात शरद पवार भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

पुणे : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांच्या पक्षाच्या येण्याने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. महायुतीमधील चर्चेप्रमाणे विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकांसाठीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता कमी झाली आहे, यामुळे आता त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्धार केल्याची चर्चा केली आहे. आता, पुढील 4 ते 5 दिवसांत हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या लेकीने स्टेटवर तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवारांच्या पक्षाचे चिन्ह ठेवल्याचं दिसून आलं आहे. यामुळे आता इंदापूर मतदारसंघात शरद पवार भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तुतारी फुंकणार अशी चर्चा होती, त्याचबरोबर शरद पवारांसोबत त्यांचे बॅनर देखील लावण्यात आलेले होते, त्यानंतर पाटील कोणता निर्णय घेणार अशा चर्चा सुरू होत्या अशातच त्यांच्या मुलीने देखील याबाबतचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही तर आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली असून उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणा करतील. दुसरीकडे त्यांची कन्या अंकिता यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. 

हर्षवर्धन पाटील यांची कारकीर्द

1995 साली पहिल्यादा अपक्ष म्हणून आमदार 

1999 आणि 2004 या निवडणुक हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आहेत 

2009 साली हर्षवर्धन पाटील काँगेसच्या चिन्हावर आमदार

1995 ते 2014 पर्यत हर्षवर्धन पाटील मंत्री राहिले

2014 साली आघाडी फुटल्याने हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी केला पराभव

2019 साली आघाडीतून तिकीट मिळत नसल्याच्या कारणावरून भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती

पुन्हा 2024 मध्ये महायुतीतून तिकीट मिळत नसल्याने पुन्हा एकदा तुतारी हाती घेणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
Gunaratna Sadavarte सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushil kumar Shinde on Savarkar : सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रात सावरकरांच्या कार्याचा गौरवUddhav Thackeray Slam Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्यांचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणारSunil Tatkare Exclusive Interview : हेलॅकॉप्टर अपघात ते जागा वाटपाचा फॉर्म्युला, तटकरेंची मुलाखतTop 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
Gunaratna Sadavarte सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
कोल्हापूर पोलिसांच्या दोन पथकांना
कोल्हापूर पोलिसांना "शोधून" सापडत नसलेला विशाळगड दंगलीतील फरार आरोपी कणेरी मठावर काडसिद्धेश्वर महाराजांच्या भेटीला!
'प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी अन्.., रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर
'प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी अन्.., रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर
Harshvardhan Patil: इंदापुरात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी? हर्षवर्धन पाटलांकडून तुतारी फुंकण्याचे संकेत; शरद पवार भाकरी फिरवणार, घडामोडींना वेग
इंदापुरात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी? हर्षवर्धन पाटलांकडून तुतारी फुंकण्याचे संकेत; शरद पवार भाकरी फिरवणार, घडामोडींना वेग
Maharashtra Vidhan Sabha Election : शरद पवारांनी फक्त 30 दिवसात सहकार पंढरीतील भाजपचे दोन मोहरे गळाला लावले! तिसरा दणका सोलापुरात?
शरद पवारांनी फक्त 30 दिवसात सहकार पंढरीतील भाजपचे दोन मोहरे गळाला लावले! तिसरा दणका सोलापुरात?
Embed widget