Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; देशातील महानगरांमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत काय?
Petrol Diesel Price Today : देशात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत घट. तुमच्या शहरांतील दर काय?
Petrol Diesel Price in 27 November 2022: गेल्या काही काळापासून जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी उलथापालथ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price) घसरल्यानंतर त्याचा देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर (Petrol Diesel Price) मात्र कोणताही परिणाम होत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतात दररोज सकाळी 6 वाजता हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum), भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि इंडियन ऑईल (Indian Oil) या प्रमुख तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. आज रविवारी सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज म्हणजेच, 27 नोव्हेंबर 2022 रोजी देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
बऱ्याच काळापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत 2 टक्क्यांनी घट झाल्यानंतर ते प्रति बॅरल 83.63 डॉलरवर पोहोचलं आहे. तर दुसरीकडे, WTI क्रूड ऑईलच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या किमतीत 2.13 टक्क्यांनी घट झाल्यानंतर, ते प्रति बॅरल 76.28 डॉलरवर व्यापार करत आहे. यासोबतच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांतही बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा मोठा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता. वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांनी कपात केली होती.
तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या, एका क्लिकवर
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).