एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की नाही? कच्च्या तेलांच्या दरांसह जाणून घ्या Latest Updates

Petrol Diesel Price: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये काहीशी उसळी पाहायला मिळत आहे. मात्र देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत.

Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil) पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 86 डॉलरच्या पुढे गेलं आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अनेक दिवसांपासून देशभरात तेलाच्या किमती स्थिर आहेत.

आज 16 एप्रिल रोजीही राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

iocl नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत स्थिरच आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार होऊनही दर कमी किंवा वाढलेले नाहीत, मग दर किती दिवस स्थिर राहतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कच्च्या तेलाचे दर काय? 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरांत उसळी पाहायला मिळत आहे. अलिकडेच तेल उत्पादक देशांनी मे महिन्यांपासून तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ नोंदवली जात आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, WTI कच्च्या तेलाच्या किमती आज 0.44 टक्क्यांनी वाढल्या आणि प्रति बॅरल 82.52 डॉलरवर पोहोचल्या होत्या. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमती 0.26 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 86.31 डॉलरवर व्यापार करत आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget