Petrol and Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिरच; 16 राज्यात अद्यापही पेट्रोल शंभरीपार
Petrol Diesel Price: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Price Today: जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूड 2 डॉलरपेक्षा जास्त महागलं आहे आणि 87 डॉलर्सचा दर ओलांडला आहे. कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 2 डॉलरपेक्षा जास्त वाढून प्रति बॅरल 87.21 डॉलरपर्यंत पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दर देखील प्रति बॅरल 83.16 डॉलरपर्यंत वाढला आहे.
आज 12 एप्रिल रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. जवळपास 10 महिन्यांपासून दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
श्रीगंगानगरमध्ये सर्वात महाग इंधन
भारतातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जात आहे. येथे एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 109.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.66 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
देशात मे 2022 नंतर किंमतींमध्ये कोणताही बदल नाही
शेवटच्या वेळी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते. त्यानंतर पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले आहेत. जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील दर आणखी घटले होते.
16 राज्यांमध्ये पेट्रोल 100
देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचलं आहे. दुसरीकडे, डिझेलबद्दल बोलायचं झाल्यास, ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ते 100 रुपयांच्या वर गेलं आहे.
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत SMSद्वारे चेक करा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.