एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price: देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती घटल्या की, वधारल्या? झटपट पाहा Latest Rate

Petrol and Diesel Price: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Petrol and Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान मंगळवारी सकाळी अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price) किरकोळ किमतीत बदल झाला. मात्र, देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड 85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या किमती आणखी वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 84.96 डॉलरपर्यंत वाढली आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल 80.53 डॉलरपर्यंत वाढला आहे.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

iocl नं जारी केलेल्या दरांनुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार होऊनही दर वाढलेले नाहीत किंवा कमीही झालेले नाहीत. अशातच दर किती दिवस स्थिर राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा दिल्ली-मुंबईसह देशातील महानगरांतील तेलाच्या किमतींवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीसCM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Embed widget