![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Small Savings Schemes: सरकारच्या छोट्या बचतींमध्ये पैसे गुंतवताय? या वर्षाअखेरपर्यंत तुमच्या पैशांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता
छोट्या बचतींवरील व्याजदरांबद्दल या महिन्याच्या शेवटी रिविजन केलं जाणार आहे. त्यामध्ये सार्वजनिक भविष्य निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि किसान विकास पत्रचा (KVP) समावेश आहे.
![Small Savings Schemes: सरकारच्या छोट्या बचतींमध्ये पैसे गुंतवताय? या वर्षाअखेरपर्यंत तुमच्या पैशांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता Small Savings Schemes interest rates on PPF NSC KVP small savings are likely to increase Bachat Yojana Marathi news Small Savings Schemes: सरकारच्या छोट्या बचतींमध्ये पैसे गुंतवताय? या वर्षाअखेरपर्यंत तुमच्या पैशांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/6296a91e6c9b1269b914baca3248b38f1670671688960279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: तुम्ही जर लहान-सहान बचत करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या वर्षाच्या अखेरीस सर्वसामान्यांना दिलासा देण्याची तयारी केंद्र सरकारने केली असून छोट्या बचतींवरील (Small Savings Schemes) व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर सर्वसामांन्यांच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आता बचतींवरील व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये सार्वजनिक भविष्य निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि किसान विकास पत्रचा (KVP) समावेश आहे.
छोट्या बचतींवरील व्याजदरासंबंधित (Small Savings Schemes) या वर्षाअखेरीस रिविजन करण्यात येणार आहे. या वर्षभरात आरबीआयने एकून 2.25 टक्क्यांनी रेपो दरात वाढ केली आहे. गेल्या आठवड्यातही आरबीआयने 35 अकांची वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना यापासून दिलासा देण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. त्याचाच भाग म्हणून छोट्या बचतींवरील व्याजदरात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.
या वर्षाअखेरीस जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीच्या व्याजदरासाठी रिविजन करण्यात येणार आहे. छोट्या बचती योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि किसान विकास पत्र (KVP) यासारख्या योजना या केंद्र सरकारकडून चालवण्यात येतात. सर्वसामान्यांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा उद्देश यामागे आहे.
छोट्या बचती या तीन कॅटेगरीमध्ये विभागल्या जातात. पहिली बचत योजना, दुसरी सामाजिक सुरक्षा योजना आणि तिसरी प्रत्येक महिन्यासाठी कमाई योजना. छोट्या बचत योजना या एक ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी चालवल्या जातात. वरील योजनांव्यतिरिक्त त्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना खाते आणि सिनियर सिटिझन सेविंग स्किमचाही समावेश होतो.
Small Savings Schemes: गेल्यावेळी व्याजदरात वाढ करण्यात आली होती
या तिमाहीत केंद्र सरकारने किसान विकास पत्र सिनियर सिटिझन सेविंग स्किम, मंथली इन्कम स्किम आणि दोन ते तीन वर्षांच्या बचत योजनांसाठी व्याजदर रिवाईज केलं होतं. सरकारने यावर 0.10 ते 0.30 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली होती. सध्या पाच वर्षांच्या एफडीवर 6.7 टक्के व्याजदर मिळतोय. तर पाच वर्षांच्या रेकरिंग डिपॉझिटवर 5.8 टक्के व्याजदर मिळतोय. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी खाते योजनेवर अनुक्रमे 6.8 आणि 7.6 टक्के व्याजदर मिळतोय. तसेच सार्वजनिक भविष्य निधीवर (PPF) 7.1 टक्के व्याजदर मिळतोय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)