एक्स्प्लोर

Old Pension Scheme : राज्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याची आश्वासनं देऊ नयेत, तिजोरीला भार झेपणार नाही; रिझर्व्ह बँकेचा इशारा

RBI on Old Pension Scheme : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकारला इशारा दिला आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर परिणाम होईल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

Old Pension Scheme Update : एकीकडे जुनी पेन्शन योजना (Old Pension) पुन्हा लागू करण्याची मागणी होत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने राज्य सरकारला इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) राज्यांना जुनी पेन्शन (Old Pension Scheme) योजना पुन्हा सुरु करण्याचा विचार करू नये, असा इशारा दिला आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) सुरु केल्या खर्च अनेक पटींनी वाढून त्यामुळे तिजोरीवर भार पडेल, असं आरबीआने म्हटलं आहे. आरबीआयने अहवालात जुन्या पेन्शन योजनेच्या आश्वासनांवर चिंता व्यक्त केली आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांमुळे आर्थिक बोजा वाढू शकतो, असा सल्ला RBI नी राज्य सरकारांना दिला आहे. OPS सरकारी तिजोरीसाठी अत्यंत हानिकारक सिद्ध होईल.

काही राज्यांमध्ये OPS लागू, काही राज्यांमध्ये विचार सुरू

अलीकडेच काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली आहे. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे. तसेच कर्नाटकातही जुनी पेन्शन योजना (OPS) आणण्याची चर्चा सुरू आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) राज्यांना नवीन पेन्शन योजना (NPS) सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आरबीआयने 'स्टेट फायनान्स : अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2023-24' हा अहवाल प्रसिद्ध करत राज्यांना इशारा दिला आहे. आरबीआयने राज्यांना इशारा देत म्हटलं आहे की, जर सर्व राज्यांनी जुनी पेन्शन योजना (OPS) परत आणली, तर त्यांच्यावरील आर्थिक भार सुमारे 4.5 पट वाढेल. जुनी पेन्शन योजना (OPS) चा GDP वर नकारात्मक परिणाम होईल. यावरील अतिरिक्त खर्चाचा बोजा 2060 पर्यंत जीडीपीच्या 0.9 टक्क्यांवर पोहोचेल.

विकासकामांसाठी निधी मिळणार नाही

आरबीआयच्या (RBI) अहवालानुसार, ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरु केली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनीही ते आणण्याचा विचार सुरू केला आहे. तसे झाल्यास राज्यांवरचा आर्थिक बोजा वाढून विकासकामांवर होणारा खर्च कमी होईल. RBI ने म्हटले आहे की, जुनी पेन्शन योजना (OPS) हे मागासलेले पाऊल आहे. हे मागील सुधारणांमधून मिळालेले नफा कमी करेल. यामुळे भावी पिढ्यांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, जुनी पेन्शन योजना (OPS) ची शेवटची तुकडी 2040 च्या सुरुवातीला निवृत्त होईल आणि त्यांना 2060 पर्यंत पेन्शन मिळत राहील.

आश्वासने देऊन खर्च वाढवू नका : RBI

पुढील वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने लोकप्रतिनिधी आश्वासने देऊन खर्च वाढवण्याऐवजी महसूल वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सर्व राज्यांनी आपली कमाई वाढविण्याचा विचार करावा, असे या अहवालात म्हटलं आहे. राज्यांनी नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क कमी करणे, अवैध खाणकाम थांबवणे, कर संकलन वाढवणे आणि करचोरी थांबवणे यावर भर दिला पाहिजे. याशिवाय मालमत्ता आणि ऑटोमोबाईलवरील करांचे नूतनीकरण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, ज्यामुळे राज्यांचा महसूल वाढेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aadhaar Link Voter ID : आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO

व्हिडीओ

Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
Indigo Airlines Crisis: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
Pune BJP : उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
Embed widget