search
×

Aadhaar Link Voter ID : आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट

Voter ID Aadhaar Link : आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आणि यासाठी कोणतीही मुदत ठेवलेली नाही, अशी माहिती सरकारने दिली आहे.

FOLLOW US: 
Share:

Aadhaar Card Link Voter ID : एकीकडे आधार (Aadhaar Card) मोफत अपडेट  करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.केंद्र सरकारने (Central Govenment) आधार कार्ड (Aadhaar Card) आणि मतदार ओळखपत्र (Voter ID) लिंक करण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. व्होटर आयडीसोबत आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आणि यासाठी कोणतंही टार्गेट किंवा मुदत अद्याप ठेवण्यात आलेली नाही. 

आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार? 

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, भारत सरकारने मतदान ओळखपत्रासोबत (Aadhaar Link Voter ID) आधार कार्ड लिंक करण्याला आतापर्यंत सुरुवात केलेली नाही. सध्या आधार-पॅन लिंक करण्याची प्रक्रिया चालू आहे. मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचं कोणतंही लक्ष्य अद्याप देण्यात आलेलं नाही.

केंद्र सरकारकडून नवीन अपडेट

कायदा मंत्री मेघवाल यांनी सांगितलं की, भारताच्या निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे की, EPIC शी आधार लिंक करणे अद्याप सुरू झालेलं नाही. याशिवाय फॉर्म 6B जमा करण्याची मुदत एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. मात्र, मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करू शकता. पण, आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करणं अद्याप बंधनकारक करण्यात आलेलं नाही.

तुम्ही फॉर्म 6B कधी सबमिट करू शकता?

तुम्हाला मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करायचा असल्यास, तुम्हाला फॉर्म 6B सबमिट करावा लागेल, ज्याची अंतिम मुदत मार्च 2024 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काँग्रेस खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कायदा मंत्र्यांनी सांगितलं की, ज्यांची ओळखपत्रे वेगळी होती आणि नावे सारखी होती, त्यांची नावं मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत

दरम्यान, आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर आहे. या तारखेनंतर UIDAI आधारमध्ये कोणतीही माहिती अपडेट किंवा बदल करण्यासाठी शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसल्यास वेळ न दवडता वेळीच हे काम करुन घ्या आणि नंतर दंड भरण्यापासून सुटका मिळवा.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aadhaar Card : सावधान! तुमच्या आधार कार्डचा वापर चुकीच्या ठिकाणी तर होत नाहीय ना? लगेच चेक करा नाहीतर...

Published at : 10 Dec 2023 07:23 AM (IST) Tags: government aadhaar card voter ID aadhaar pan link Aadhaar Link PAN Card

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक