(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fixed Deposit: मुदत ठेवीवर या दोन बँकांकडून 9 टक्के व्याज दर; खास ऑफर्सच्या घ्या फायदा
Investment Fixed Deposit: मुदत ठेवीवर दोन बँकांकडून 9 टक्के व्याज दर देण्यात येत आहे. याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
Investment Fixed Deposit: गेल्या काही दिवसांत अनेक बँकांनी मुदत ठेवीवरील (Investment Fixed Deposit) व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात वाढ (Repo Rate Hike) केल्यानंतर देशातील खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मुदत ठेव (Investment Fixed Deposit) ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक (Investment) मानली जाते. गुंतवणुकीसाठी इतर पर्याय असतानादेखील अनेकजण मुदत ठेवीसाठी प्राधान्य देतात. बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर जास्त व्याज देतात. दोन बँकांकडून मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज दर दिला जात आहे. सध्या बहुतांशी बँकांकडून मुदत ठेवीवर 4 ते 7 टक्क्यांदरम्यान व्याज दिले जात आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank)
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात 50 बेसिस अंकांची वाढ केली आहे. बँकेचे नवीन व्याजदर 6 डिसेंबरपासूनच लागू झाले आहेत. या बँकेच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना चांगला व्याजदर मिळत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 9.26 टक्के दराने व्याज दिला आहे.
मुदत ठेव योजनेवर ऑफर (Offer On Fixed Deposit)
बँकेने 15 दिवसांच्या मुदतीसह 5 वर्षांच्या मुदत ठेवीची ऑफर सुरू केली आहे. या योजनेतंर्गत गुंतवणूक केल्यास सर्वसामान्यांना 9.01 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना 9.26 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank)
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेनेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडून मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 4.5 टक्के ते 9 टक्के व्याजदर देत आहे. बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, सध्या ज्येष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसांच्या मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त, इतरांना 181 दिवसांसाठी मुदत ठेवीवर 8.50 टक्के दराने व्याज देण्याची घोषणा बँकेने केली आहे.
युनिटी स्मॉल बँक ही एक शेड्युल्ड कमर्शियल बँक आहे. सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे संयुक्त गुंतवणूकदार म्हणून रेसिलियंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसह प्रमोटर आहेत. रिझर्व्ह बँकेने या महिन्यात रेपो दरात 0.35 टक्क्यांची वाढ केली होती.
इतर महत्त्वाची बातमी: