Google pay Loan : फक्त एका क्लिकवर मिळणार 1 लाखांपर्यंतचे कर्ज! कसं कराल अप्लाय, जाणून घ्या
Google pay Loan : आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला अचानक पैशाची गरज भासते. अशा परिस्थितीत पर्सनल लोन घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Apply For Personal Loan Through Google Pay: आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला अचानक पैशाची गरज भासते. अशा परिस्थितीत पर्सनल लोन घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्हालाही अचानक पैशांची गरज भासत असेल आणि तुम्ही 'गुगल पे' वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही गुगल पेद्वारे फक्त एका क्लिकवर 1 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. तुमचा सिव्हिल स्कोर (CIBIL Score) चांगला असल्यास तुम्ही Google Pay अॅपद्वारे 10 मिनिटांत कर्ज मिळवू शकता.
गुगल पे ने DMI Finance Limited (DMI) सोबत हातमिळवणी करून पर्सनल लोनची ही सुविधा सुरू केली आहे. ही एक अतिशय सोपी आणि झटपट (डिजिटल पर्सनल लोन) कर्ज मिळून देणारी सुविधा आहे. Google Pay आणि DMI Finance Limited कडून ग्राहक सहजपणे या Instant Personal Loan चा लाभ घेऊ शकतात.
फक्त याच ग्राहकांना मिळणार 'गुगल पे'च्या या सुविधेचा फायदा
सर्वच गुगल पे वापरकर्त्यांना या पर्सनल लोन सुविधेचा लाभ घेता येणार नाही. तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, तुमच्या उर्वरित कागदपत्रांनुसार तुम्हाला Google Pay द्वारे कर्जाची रक्कम ऑफर केली जाईल. जर तुम्ही याचे प्री-अप्रूव्ह ग्राहक (Pre Approved Customer) असाल, तर तुम्हाला लवकरच लोनची प्रक्रिया केल्यानंतर त्वरित कर्ज (Instant Loan Offer) दिले जाईल.
असं करा अप्लाय :
- हे लोन मिळवण्यासाठी सर्वात आधी गॉगल पे अॅप ओपन करा.
- यानंतर Promotions च्या खाली Money चा ऑप्शन दिसेल तो ओपन करा.
- यानंतर Loan ऑप्शनवर क्लिक करा.
- यात तुम्हाला DMI ऑप्शन दिसले, त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुम्ही किती रुपयांचे लोन घेऊ शकता याचे ऑफर्स दिसेल.
- यानंतर तुम्हाला तुमचे Application प्रोसेस करायचे आहे.
- यानंतर तुमचे लोन Approve होईल आणि तुमच्या खात्यात झटपट पैसे ट्रान्सफर केले जातील.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- LIC IPO : एलआयसी विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी, LIC IPO अर्ज करण्याआधी 'हे' काम कराच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt