एक्स्प्लोर

EPFO e Sign Process : पीएफ खातेधारकांनो सावधान! ई-साईन' केली नाही तर पैसे अडकणार; जाणून घ्या सोपी ऑनलाईन पद्धत

EPFO e-Sign Mandatory : एखाद्या कर्मचाऱ्याने ई-नॉमिनेशन ई-साइन केलेले नसेल, तर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाला किंवा वारसाला पीएफ, पेन्शन (Pension), विम्याचे पैसे मिळण्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात.

EPFO e-Sign Mandatory Process : पीएफ (PF) खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक अपडेट समोर आली आहे. अनेक कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यासाठी (EPF Account) ऑनलाईन ई-नॉमिनेशन (e-Nomination) फॉर्म भरतात आणि आपली प्रक्रिया पूर्ण झाली असे समजून सोडून देतात. मात्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत तुम्ही आधार ऑथेंटिकेशन वापरून 'ई-साइन' (e-Sign) करत नाही, तोपर्यंत तुमची ई-नॉमिनेशनची प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण मानली जाणार नाही.

ई-साइन न केलेले ई-नॉमिनेशन पूर्णपणे अवैध (Invalid) मानले जाते. जर दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याचे ई-नॉमिनेशन ई-साइन केलेले नसेल, तर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाला किंवा वारसाला पीएफ (PF), पेन्शन (Pension) आणि विम्याचे (Insurance) पैसे मिळण्यात प्रचंड कायदेशीर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक खातेधारकाने ई-साइन करणे बंधनकारक आहे.

EPF Claims Benefit : ई-साइन करण्याचे नेमके काय आहेत फायदे?

जर पीएफ खात्याचे ई-नॉमिनेशन कायदेशीररित्या पूर्ण आणि ई-साइन केलेले असेल, तर संबंधित कुटुंबाला खालील फायदे सहज मिळतात:

आर्थिक लाभ : कर्मचाऱ्याच्या निधनानंतर नॉमिनीला (वारसाला) खात्यातील जमा रक्कम, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि कर्मचारी ठेव लिंक विमा योजना (EDLI) चे तब्बल 7 लाख रुपयांपर्यंतचे फायदे विनासायास मिळतात.

ऑनलाईन क्लेम : आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर केवळ एका OTP द्वारे कुटुंबातील सदस्य घरबसल्या ऑनलाईन क्लेम करू शकतात, ज्यामुळे कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज पडत नाही.

तुमच्या पीएफ खात्याची ई-नॉमिनेशन आणि ई-साइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

ई-नॉमिनेशन (e-Nomination) कसे करावे?

1. सर्वात आधी EPFO च्या अधिकृत मेंबर पोर्टल वेबसाइटवर (unifiedportal-mem.epfindia.gov.in) जा आणि तुमचा UAN नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
2. लॉगिन केल्यानंतर मुख्य मेन्यूमधील 'Manage' या टॅबवर जा आणि तिथे 'e-Nomination' या पर्यायावर क्लिक करा.
3. पुढील स्क्रीनवर तुम्हाला 'Having Family' चा पर्याय दिसेल. तुमचे कुटुंब असल्यास तिथे 'Yes' हा पर्याय निवडा.
4. आता नॉमिनीचे (वारसाचे) नाव जोडण्यासाठी त्या कौटुंबिक सदस्याचा आधार नंबर, नाव, जन्मतारीख, पत्ता आणि इतर विचारलेली अचूक माहिती भरा.
5. त्या सदस्याला पीएफच्या रकमेतील एकूण किती हिस्सा (Share %) द्यायचा आहे ते निश्चित करा. (उदा. एकाच व्यक्तीला पूर्ण अधिकार द्यायचा असल्यास 100% लिहा). सर्व माहिती भरल्यानंतर खाली असलेल्या 'Save EPF Nomination' वर क्लिक करा.

सर्वात महत्त्वाची प्रक्रिया - 'ई-साइन' (e-Sign) कशी करावी?

नॉमिनेशन यशस्वीरीत्या सेव्ह केल्यानंतर खालीलप्रमाणे ई-साइन करणे अनिवार्य आहे:
1. पुन्हा 'e-Nomination' या विभागात जा, तिथे तुम्हाला स्क्रीनवर 'e-Sign' चा एक पर्याय हायलाइट झालेला दिसेल, त्यावर क्लिक करा.
2. पुढील पेजवर संबंधित पीएफ खातेधारक सदस्याचा अधिकृत आधार नंबर विचारला जाईल, तो तिथे अचूक प्रविष्ट करा.
3. आधार नंबर सबमिट केल्यानंतर, तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नोंदणीकृत (Registered) मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP (वन टाइम पासवर्ड) पाठवला जाईल.
4. तो प्राप्त झालेला OTP नियुक्त रकान्यात टाका आणि 'Verify' किंवा 'Submit' बटणावर क्लिक करा.

महत्त्वाची नोंद : युझरने आधार OTP सबमिट करताच स्क्रीनवर 'Declaration Successfully Signed' असा संदेश येईल. याचा अर्थ तुमची ई-नॉमिनेशन आणि ई-साइनची प्रक्रिया आता पूर्णपणे यशस्वी झाली आहे. यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.

ही बातमी वाचा:

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO e Sign Process : पीएफ खातेधारकांनो सावधान! ई-साईन' केली नाही तर पैसे अडकणार; जाणून घ्या सोपी ऑनलाईन पद्धत
पीएफ खातेधारकांनो सावधान! ई-साईन' केली नाही तर पैसे अडकणार; जाणून घ्या सोपी ऑनलाईन पद्धत
मारुतीशी संलग्न कंपनीचे शेअर्स अचानक 11 टक्क्यांनी वाढले; कारणं काय?
मारुतीशी संलग्न कंपनीचे शेअर्स अचानक 11 टक्क्यांनी वाढले; कारणं काय?
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर: तुमच्या मासिक बजेटवर ताण न आणता स्मार्ट कर्ज कसे घ्याल?
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर: तुमच्या मासिक बजेटवर ताण न आणता स्मार्ट कर्ज कसे घ्याल?
Sara Ali Khan Rents Out Mumbai Bungalow: फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी
फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
Embed widget